गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजपा पदाधिकारी राकेश कोष्टीवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:05 PM2023-04-16T15:05:51+5:302023-04-16T15:06:13+5:30

वर्चस्ववादातून घडला प्रकार, मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडल्याने गँगवॉर

Firing on BJP office bearer Rakesh Koshti who has criminal background | गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजपा पदाधिकारी राकेश कोष्टीवर गोळीबार

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजपा पदाधिकारी राकेश कोष्टीवर गोळीबार

googlenewsNext

नरेंद्र दंडगव्हाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक सिडको: पूर्वी एकमेकांचे मित्र राहिलेले मात्र काही महिन्यांपूर्वी आपापसात झालेला वाद तसेच काहींवर करण्यात मोक्काअंतर्गत झालेल्या कारवाईमुळे दोस्तीत वादाची ठिणगी पडून दोघांमध्ये वैर निर्माण होऊन भडकलेल्या गॅंगवॉरमधून रविवारी (दि.१६) सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास गुन्हेगारीचे पार्श्वभूमी असलेला भाजपाचा पदाधिकारी राकेश तुकाराम कोष्टी यांच्यावर सिडकोमधील बाजीप्रभू चौक भागात दुचाकीवर आलेल्या तिघांनी पाठीमागून गोळीबार केल्याची घटना घडली.

गोळीबार करणाऱ्या संशयतांनापैकी एका संशयतास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गोळीबारामुळे सिडको परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिडको भागात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. भर दिवसा हातात कोयते घेत दहशत पसरविन्याचे प्रकार नित्याचेच झालेले असाचाना यातच रविवारी सुट्टीचा दिवस असताना गुन्हेगार राकेश कोष्टी हा सकाळी दहा वाजे सुमारास बाजीप्रभू चौक येथील मंदिरात त्याच्या बुलेट दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्या कोष्टीला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी गोळीबाराचा  कट रचण्याच्या संशयात पंचवटी येथील जयेश दिवे याला पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोन संशयतांच्याही पोलिस मागावर आहे. राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार करणारे पूर्वी एकमेकांचे मित्र होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने वर्चस्वाच्या लढाईतून एकमेकांनाना शह देण्याची स्पर्धा सुरू झाल्याने त्यांच्यात गॅंगवॉर भडकले असून एकमेकांचा काटा काढण्यासाठी दोघे एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना रविवारी (दि.१६) अखेर कोष्टी मंदिरात दर्शनासाठी जाताना सापडला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कोष्टी गंभीर जखमी झाला आहेय या घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली, श्रीकांत निंबाळकर यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात हेली आहे.

Web Title: Firing on BJP office bearer Rakesh Koshti who has criminal background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.