धक्कादायक! भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार, हत्येच्या खटल्याच्या सुनावणीनंतर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 22:19 IST2025-02-26T22:18:33+5:302025-02-26T22:19:09+5:30

Firing outside Court: शहरातील एका न्यायालयाबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली

firing outside bielefeld court of germany shooting incidence after boxer besar nimani murder case hearing | धक्कादायक! भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार, हत्येच्या खटल्याच्या सुनावणीनंतर घडला प्रकार

धक्कादायक! भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार, हत्येच्या खटल्याच्या सुनावणीनंतर घडला प्रकार

Firing outside Court: जर्मनीतील बीलेफेल्ड शहरातील एका न्यायालयाबाहेरगोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रोफेशनल बॉक्सर बेसर निमानीच्या हत्येच्या खटल्यादरम्यान ही घटना घडली. या हत्येचा आरोपी हुसेन अक्कुर्त आहे, ज्याला बेल्जियम पोलिसांच्या मदतीने जुलै २०२४ मध्ये ब्रुसेल्समधून अटक करण्यात आली होती. तर दुसरा संशयित आयमान दाऊद किरीट अजूनही फरार आहे. मार्च २०२३ मध्ये जर्मनीतील एका कॅफेमध्ये बेसर निमानीची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे मानले जाते.

केव्हा घडला गोळीबार?

स्थानिक वेळेनुसार दुपारी १:३० वाजता न्यायालयाबाहेर गोळीबार झाला. त्यावेळी खटल्याची सुनावणी संपली होती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की अचानक गोळीबार सुरू झाला, ज्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली. स्थानिक पोलिसांनी तात्काळ परिसराला वेढा घातला आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या अनेक जर्मन वृत्तसंस्था असा अहवाल देत आहेत की, या गोळीबारात दोन लोक जखमी झाले आहेत.

पोलीस अँक्शन मोडमध्ये

जर्मन मीडिया न्यू वेस्टफॅलिशेच्या मते, गोळ्या झाडण्यात आलेले आरोपी हे अक्कुर्तचे वडील आणि भाऊ असू शकतात. पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही. या गोळीबारानंतर पोलिसांनी मोठी सुरक्षा मोहीम राबवली आहे. आतापर्यंत हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्यामागील हेतू याबाबत तपास सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी काहीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. असे मानले जाते की पोलिस लवकरच अधिकृत निवेदन जारी करू शकतात.

कोण होता बॉक्सर बेसर निमानी?

व्यावसायिक बॉक्सिंगच्या जगात नाव कमावलेल्या बेसर निमानी याची जर्मनीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ३८ वर्षीय निमानी हा मूळचा अल्बेनियन होता आणि कोसोवोचा होता. १९९७ मध्ये कोसोवो युद्धादरम्यान त्याने जर्मनीमध्ये आश्रय घेतला. त्याच्या बॉक्सिंग कारकिर्दीत, त्याने २७ पैकी २६ सामने जिंकले आणि २०१९ मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली. त्याने IBF युरोपियन सुपर वेल्टरवेट विजेतेपद आणि दोन राष्ट्रीय विजेतेपदे जिंकली होती. जर्मन प्रांतातील नॉर्थ राइन-वेस्टफेलियामधील बीलेफेल्ड शहरात निमानीची हत्या करण्यात आली होती.

Web Title: firing outside bielefeld court of germany shooting incidence after boxer besar nimani murder case hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.