आर्थिक व्यवहारांतूनच गोळीबार, ४८ तासांत चार जणांना पकडले;२२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

By नरेश रहिले | Published: January 13, 2024 06:49 PM2024-01-13T18:49:38+5:302024-01-13T18:49:55+5:30

कल्लू यादव गोळीबार प्रकरण

Firing over financial transactions, four nabbed in 48 hours; police custody till January 22 | आर्थिक व्यवहारांतूनच गोळीबार, ४८ तासांत चार जणांना पकडले;२२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

आर्थिक व्यवहारांतूनच गोळीबार, ४८ तासांत चार जणांना पकडले;२२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

गोंदिया: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४२, रा. बाराखोली, सिंधी कॉलनी, गोंदिया) यांच्यावर गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील तपासात आतापर्यंत सहा आरोपी स्पष्ट झाले असून आणखी आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे.

या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. दोघे फरार असून त्यांच्या मागावर पोलीस आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीत गणेश शिवकुमार शर्मा (२१) रा. भिंडी ले आऊट वरोडा ता. कळमेश्वर जि. नागपूर, अक्षय मधुकर मानकर (२८) रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलनी कळमेश्वर जि नागपूर, धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत (३२) रा. कुंभारेनगर गोंदिया व नागसेन बोधी मंतो (४१) रा. गौतमबुध्द वॉर्ड श्रीनगर गोंदिया यांचा समावेश आहे. तर प्रशांत मेश्राम रा. भीमनगर गोंदिया व राेहीत मेश्राम रा. कळमेश्वर नागपूर हे दोघेही फरार आहेत.

पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार एका दुचाकीवर अक्षय मानकर व गणेश शर्मा हे दोघेही ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दुचाकीवर येऊन त्यांनी कल्लू यादव यांच्यावर गोळी झाडली. अक्षय मानकर हा दुचाकी चालवित होता तर गणेश शर्मा याने कल्लू यादव यांच्यावर फायरिंग केली. फायरिंग केल्यानंतर ते नागपूरला पळून गेले. नागपूरच्या आरोपींना नागपुरातून अटक करण्यात आली. परंतु धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत (३२) याला गंगाझरीच्या जंगलातून अटक करण्यात आली. तर नागसेनला त्याच्या घरून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, पोलीस उपनिरीक्षक वानखेडे, सहाय्यक फौजदार अजुर्न कावळे, मधुकर कृपाण, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, सुजित हलमारे, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्रसिग तुरकर, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, प्रकाश गायधने, पोलीस शिपाई संतोष केदार, हंसराज भांडारकर, अजय रांहागडाले, चालक पोलीस शिपाई घनशाम कुंभलवार, मुरलीधर पांडे, लक्ष्मन बंजार, सायबर सेलचे पोलीस हवालदार दिक्षीत दमाहे, धनंजय शेंड, जागेश्वर उईके, कवलपालसिंह भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, रिना चव्हान, दीपक रहांगडाले, योगेश बिसेन, रहांगडाले, सोनेवाने, रावते, बारेवार, चव्हान यांनी केली आहे.

४८ तासात अटक; २२ पर्यंत पीसीआर
लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस मागावर आहे. कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अवघ्या ४८ तासात पोलिसांनी अटक केली.

प्रशांत मेश्राम मास्टरमाईंड?
पोलीसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात सद्या कल्लू यादव यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा मास्टर माईंड प्रशांत मेश्राम हा दिसून येत आहे. परंतु त्याच्या पाठीमागे आणखी लोक असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.

Web Title: Firing over financial transactions, four nabbed in 48 hours; police custody till January 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.