कोंढव्यात भावाचा जीव वाचविण्यासाठी गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 12:09 PM2019-03-30T12:09:24+5:302019-03-30T12:09:53+5:30

दुचाकी चालकाबरोबर झालेल्या वादातून आपल्या भावाला आरोपी लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे पाहून  वाचविण्यासाठी दुसऱ्या भावाने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ) कोंढव्यात घडली. 

Firing to save his brother's life in Kondhava | कोंढव्यात भावाचा जीव वाचविण्यासाठी गोळीबार

कोंढव्यात भावाचा जीव वाचविण्यासाठी गोळीबार

Next

पुणे : दुचाकी चालकाबरोबर झालेल्या वादातून आपल्या भावाला आरोपी लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे पाहून  वाचविण्यासाठी दुसऱ्या भावाने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ) कोंढव्यात घडली. 
याप्रकरणी कोंढवापोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे़ सुफियान रफिक खान (वय ३३, रा़ कौसरबाग, कोंढवा), उबेद सईद खान (वय ३०, रा़ रविवार पेठ) आणि अब्दुला रजा शेख (वय २८, रा़ क्लाऊड नाईन सोसायटी, कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत़ 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अब्दुल दुराज गोरे (वय १९, रा़ कोंढवा) हा त्यांची मोटार घेवून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीजवळून जात होता़ सोसायटीमध्ये वळत असताना त्याच्या गाडीसमोर एक मोटारसायकलस्वार अचानक आल्याने त्याला गोरे यांनी थांबण्याचा इशारा केला. त्या कारणाने त्याने शिवीगाळ करत फिर्यादीला हातातील हेल्मेटने मारहाण केली़ त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले व त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली़ मार चुकविण्यासाठी अब्दुला हे पळत सोसायटीत शिरले व पार्किंगजवळ केले़ आरोपीही त्यांचा पाठलाग करत त्यांच्याजवळ पोहचले़ त्याला लोखंडी रॉडने मारहाण करु लागले़ अब्दुला यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा चुलत भाऊ हसन समीर गोरे हा तिथे आला व तेव्हा अब्दुलाने मोठ्याने ओरडून भाई मेरे को बचाओ नही तो ये लोग मुझे मार डालेगे असे म्हणू लागला़ तेव्हा हसन याने त्याच्याकडील पिस्तुल काढले व उसको छोडे नही तो मुझे गोली चलाने पडेगी असे म्हणून पिस्तुलातून हवेत गोळीबार केला़ पिस्तुल पाहून आरोपी पळून गेले़ अब्दुला दुराज गोरे यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Web Title: Firing to save his brother's life in Kondhava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.