5 रुपयांचा लिंबू खरेदीवरून गोंधळ, दुकानदाराने ग्राहकाला घातल्या गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 09:36 AM2022-06-03T09:36:36+5:302022-06-03T09:37:02+5:30

Rajasthan Crime News : या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

firing shopkeeper customer dispute 100 rupees note change 5 rupees lemon abusing injured bharatpur rajasthan | 5 रुपयांचा लिंबू खरेदीवरून गोंधळ, दुकानदाराने ग्राहकाला घातल्या गोळ्या 

5 रुपयांचा लिंबू खरेदीवरून गोंधळ, दुकानदाराने ग्राहकाला घातल्या गोळ्या 

googlenewsNext

भरतपूर : राजस्थानमधील भरतपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 5 रुपये किमतीचे लिंबू घेण्यावरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील वाद इतका वाढला की, दुकानदाराने चक्क साथीदारांच्या मदतीने ग्राहकावर गोळ्या झाडल्या. यानंतर जखमी ग्राहकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्राहकाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी आरबीएम रुग्णालयात पाठविले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे प्रकरण भरतपूरच्या डीग पोलीस स्टेशन हद्दीतील बहज गावातील आहे. पोलिसांनी सांगितले की, दिनेश जाटव हे सायंकाळी महेंद्र बच्चू यांच्या दुकानात लिंबू घेण्यासाठी गेला होता. दुकानातून त्याने 100 रुपये देऊन 500 रुपये किमतीचे लिंबू विकत घेतले. यावेळी सुट्ट्या पैशांच्या मुद्द्यावरून दिनेश व महेंद्र यांच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली. यानंतर दुकानदाराचे साथीदार रात्री 8.30 वाजता दिनेश यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. बंदुकीची गोळी दिनेश यांच्या कानाला चाटून गेली.

पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, दुकानदार महेंद्र यांचा लहान मुलगा भोलू हा काठ्या आणि रॉड घेऊन घरी आला. घरी आल्यानंतरही त्याने तिला शिवीगाळ केली. आम्ही दिनेश यांना घराबाहेर पडू दिले नाही. त्यानंतर धर्मा उर्फ ​​धर्मेंद्र जाट पुत्र जयवीर नावाच्या व्यक्तीने घरावर चार गोळ्या झाडल्या. तसेच, संधी पाहून धर्माने दिनेश यांच्यावर गोळी झाडली.

दुसरीकडे, डीआयजी सीओ आशिष कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी उशिरा दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. एका दुकानदाराने त्याच्या काही साथीदारांसह ग्राहकावर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: firing shopkeeper customer dispute 100 rupees note change 5 rupees lemon abusing injured bharatpur rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.