खळबळजनक! प्रियकराने लग्नास दिला नकार, तरूणीने त्याला फसवण्यासाठी केली स्वत:च्या बहिणीची हत्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:31 AM2021-03-11T09:31:17+5:302021-03-11T09:31:31+5:30
Step sister killed 6 year old girl : बराच शोध घेतल्यानंतर गावातीलच एक तलावात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या तपासातून जो खुलासा झाला तो हैराण करणारा होता.
यूपीच्या (Uttar Pradesh Crime) फिरोजाबाद जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिकोहाबाद पोलीस स्टेशन क्षेत्रातील एका गावातून गेल्या मंगळवारी एक ६ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. बराच शोध घेतल्यानंतर गावातीलच एक तलावात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या तपासातून जो खुलासा झाला तो हैराण करणारा होता. चिमुकलीच्या सावत्र बहिणीनेच तिच्या प्रियकराला फसवण्यासाठीच तिची हत्या (Girls Murder) केल्याचं समोर आलं.
आरोपी तरूणीचा बॉयफ्रेन्ड विवाहित होता आणि तो तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार नव्हता. या राग आल्याने तरूणीने आपल्या ६ वर्षीय सावत्र बहिणीची हत्या केली. आणि त्यात आपल्या प्रियकराला फसवण्याचा प्लॅन केला होता. पण तो प्लॅन फसला. (हे पण वाचा : छोट्या भावाने आधी लग्न केले, मोठ्या भावाकडून पती-पत्नीची हत्या)
बेपत्ता झालेल्या मुलीच्या घराबाहेरील दरवाज्यावर एक लेटर चिटकवण्यात आलं होतं. ज्यावर लिहिले होते की, 'मुलीच्या मोठ्या बहिणीसोबत माझं लग्न लावून दिलं नाही तर तिची हत्या करेन'. कुटुंबियांना हे लेटर मिळालं तर गावात एकच गोंधळ उडाला. मंगळवारी उशीरा मुलीचा मृतदेह गावातीलच एका तलावात आढळून आला. पोस्टमार्टममध्ये खुलासा झाला की तिची हत्या गळा दाबून करण्यात आली. (हे पण वाचा : पत्नीला जिवंत पेटवून देऊन हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप)
पोलिसांनी जेव्हा मृत मुलीच्या सावत्र बहिणीची कसून चौकशी केली तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. एसएसपी अजय कुमार पांडे यांनी सांगितले की, आरोपी तरूणीने सांगितले की, तिला गावातीलच एका तरूणासोबत लग्न करायचं होतं. पण तो विवाहित होता. त्यामुळे तो तयार नव्हता. त्यामुळे मी त्याला फसवण्यासाठी हे कृत्य केंलं. पोलिसांनी तरूणीला तुरूंगात पाठवलं आहे.