"आधी मैत्री केली, नंतर बलात्कार"; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी संशयितावर गुन्हा
By सूरज.नाईकपवार | Published: December 2, 2023 11:47 AM2023-12-02T11:47:40+5:302023-12-02T11:48:09+5:30
पीडिताच्या पालकांनी यासंबंधी पाेलिसांत तक्रार केली असून, मॅशवीन गोम्स या संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मडगाव -येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रथम मैत्री करुन नंतर तिला घरी घेउन जाउन तिच्यावर बलात्कार करण्याची एक घटना गोव्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडिताच्या पालकांनी यासंबंधी पाेलिसांत तक्रार केली असून, मॅशवीन गोम्स या संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
संशयितावर भादंसंच्या ३७६, गोवा बाल कायदा कलम ८ व बाल सरक्षंण कायद्यातंर्गंत गुन्हा नोंदविला आहे. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.
२८ नोव्हेंबर रोजी बलात्काराची वरील घटना घडली होती. संशयिताने पीडिताला त्याच्या घरी नेऊन नंतर तिच्यावर बलात्कार केला असे पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.