आधी महिलेवर गँगरेप, नंतर विधवा मुलगी सांगून २ लाखांना विकले पीडितेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:20 PM2021-12-11T19:20:23+5:302021-12-11T20:16:27+5:30
Gangrape : गेस्ट हाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांसह सामूहिक बलात्काराची घटना घडवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.
राजस्थानच्या भरतपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे एका महिलेने सांगितले की, पतीसोबत भांडण करून ती तिच्या माहेरच्या घरी जात होती. त्यानंतर भरतपूर येथील डीग बसस्थानकावर त्याला एक व्यक्ती सापडली. बातचीतदरम्यान त्याने तिला फूस लावून मथुरेतील गोवर्धन येथे नेले. गेस्ट हाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांसह सामूहिक बलात्काराची घटना घडवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.
आधी महिलेवर गँगरेप, नंतर विधवा मुलगी सांगून २ लाखांना विकले पीडितेला
गँगरेपच्या घटनेनंतर तिला राजस्थानच्या करौली भागात २ लाख रुपयांना विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. जिथे त्या महिलेला ८ महिने ओलीस ठेवले होते. त्यानंतर ती कशीतरी तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली आणि तिने मथुरा गेट पोलिस ठाण्यात आरोपी महेश शर्माविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितले की, तिला आरोपीने त्याची विधवा मुलगी म्हणून विकले होते.
हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून नाराज तरुणाने घेतला गळफास लावून
आरोपीने विधवा मुलगी म्हणून विकले महिलेला
पीडितेने सांगितले की, ती मथुरा गेट पोलिस स्टेशन परिसरात राहणारी आहे. पतीशी भांडण करून ती माहेरी जात होती. त्यानंतर मथुरेतील गोवर्धन येथील बसस्थानकात राहणारा महेश शर्मा याने तिला फूस लावून गोवर्धन येथे नेले. जिथे त्याने साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर करौली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला दोन लाखांत विकले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.