आधी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद, आता पोलिसांकडून आयोजकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 03:35 PM2023-05-15T15:35:14+5:302023-05-15T15:36:47+5:30

पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार हा कार्यक्रम कुर्डुवाडी रोडवरील जैनमंदिराजवळील शेटे मळा येथे १२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता.

First Gautami Patil's program was closed, now a case has been filed against the organizer in barshi | आधी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद, आता पोलिसांकडून आयोजकावर गुन्हा दाखल

आधी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद, आता पोलिसांकडून आयोजकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

सोलापूर/बार्शी - नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या बार्शी महोत्सवास कार्यक्रम करताना परवानगी न घेता गर्दी जमवून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येथील लावणीआयोजित शासकीय आला. बार्शी येथे येथे शुक्रवार, दि. १२ मे रोजी झाला. विनापरवाना कार्यक्रम घेतल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाडकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयोजक प्रजाशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड (रा.बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी कार्यक्रमादिवशीही पोलिसांनी आयोजकाला गौतमीचा शो बंद करायला लावला होता. 

पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार हा कार्यक्रम कुर्डुवाडी रोडवरील जैनमंदिराजवळील शेटे मळा येथे १२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी शहर पोलिसांत दि. १६ मे रोजी होणाऱ्या लावणी महोत्सवास सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळण्यास अर्ज केलेला होता. पोलिसांनी या कार्यक्रमासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, महावितरण कार्यालयाचे वीजपुरवठा मंजुरीचे प्रमाणपत्र, पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कर्मचारी नियुक्ती प्रमाणपत्र, अग्निशामक यंत्रणेचे व अॅम्ब्युलन्स व वैद्यकीय सुविधा प्रमाणपत्र, या सर्व बाबींची पूर्तता केल्यास व पोलिस बंदोबस्त यांचे शुल्क भरल्यानंतर पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, असे त्यांना पत्राद्वारे पोलिसांनी कळविले होते. परंतु यातील कोणतीच पूर्तता न करता तसेच कोणतीही परवानगी न घेता त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजनासाठी पोलीस परवानगी न घेतल्यामुळे, तसेच वेळेची मर्यादा न पाळल्याप्रमाणे पोलिसांनी कार्यक्रम सुरू असलेल्याठिकाणी जाऊन शो बंद करण्यास भाग पाडलं. त्यामुळे, बार्शीकरांना गौतमीच्या केवळ एकाच गाण्यावर समाधान मानावे लागले. 

Web Title: First Gautami Patil's program was closed, now a case has been filed against the organizer in barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.