अंडरवर्ल्ड डॉन 'बकरा'च्या हत्याकांडात आलं होतं नाव, जम्मू-काश्मीरची महिला गॅंगस्टर अंबिकाची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:21 PM2021-05-28T12:21:11+5:302021-05-28T12:29:47+5:30

२००६ मद्ये हिंदुस्थान टाइम्सने एका रिपोर्टमध्ये या लेडी गॅंगस्टरचा उल्लेख करत लिहिले होते की, ती अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन संजय गुप्ता उर्फ बकराच्या हत्येत सहभागी होती.

First girl gangster of Jammu Kashmir Ambika aka Bindu played key role in murder of don Sanjay Gupta | अंडरवर्ल्ड डॉन 'बकरा'च्या हत्याकांडात आलं होतं नाव, जम्मू-काश्मीरची महिला गॅंगस्टर अंबिकाची कहाणी...

अंडरवर्ल्ड डॉन 'बकरा'च्या हत्याकांडात आलं होतं नाव, जम्मू-काश्मीरची महिला गॅंगस्टर अंबिकाची कहाणी...

googlenewsNext

आतापर्यंत भारतातील अनेक लेडी गॅंगस्टरच्या कथा तुम्ही ऐकल्या-वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हाला जम्मू-काश्मीरची पहिली महिला गॅंगस्टर अंबिका उर्फ बिंदूची कहाणी सांगणार आहोत. २००६ मद्ये हिंदुस्थान टाइम्सने एका रिपोर्टमध्ये या लेडी गॅंगस्टरचा उल्लेख करत लिहिले होते की, ती अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन संजय गुप्ता उर्फ बकराच्या हत्येत सहभागी होती.

त्यावर्षी २५ नोव्हेंबरच्या सकाळी हार्डकोर गॅंगस्टर राकेश डोगरा उर्फ मोहन आणि विशाल ठाकूर उर्फ विक्की ठाकूरने 'बकरा'वर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. या हत्याकांडानंतर सुरूवातीच्या तपासातून यात एक तरूणी सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. (हे पण वाचा : पतीकडून पत्नीची निर्दयीपणे हत्या, मेहुणीला फोन करून म्हणाला - 'तुझ्या बहिणीला छतावरून खाली फेकलं')

या हत्येत एका तरूणीचा सहभाग असल्याचं समोर आलं तर सगळेच हैराण झाले. सर्वांच्या मनात हाच प्रश्न होता की, इतक्या गंभीर गुन्ह्यात एका तरूणाची सहभाग कसा असू शकतो. पोलिसांनी त्यावेळी केवळ ४ दिवसात ही मर्डर मिस्ट्री सॉल्व केल्याचा दावा केला होता. पोलिसांनी राजेश डोगरा आणि विशाल ठाकूर यांना नवी दिल्लीहून अटक केली होती. पोलिसांना दावा केला होता की, या दोघांनी एक तरूणी अंबिका उर्फ बिंदूचं नाव सांगितलं आहे. तिनेच या हत्याकांडात सर्वात महत्वाची भूमिका बजावली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, अबिंकासोबतच या केसमध्ये एक इतर आरोपी कपिलची गर्लफ्रेन्डही होती. कपिलनेच अंबिकाला बकराच्या टचमध्ये येण्यासाठी प्रेरित केलं होतं. जेणेकरून बकरा या तरूणीला भेटण्यासाठी एकटा जाईल. पूर्ण प्लॅन तयार झाल्यावर ही तरूणी हिमाचल प्रदेशच्या डलहौजीमध्ये पोहोचली होती. त्यावेळी अंबिकाच्या घरातील लोकांनी आरोप लावला होता की, कपिल आणि त्याच्या साथीदारांनी धकमी दिली होती की, जर अंबिका घरातून बाहेर निघाली नाही तर याचा परिणाम वाईट होईल. (हे पण वाचा : पुण्यात एकतर्फी प्रेमातून गोळीबार! खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथील घटना)

धकमी दिल्यावरही अंबिकाच्या घरातील लोकांनी तिला घराबाहेर जाण्याची परवानगी दिली नव्हती. आणि तिला गुन्हेगारांपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, अंबिकाने घरातील लोकांना सांगितलं होतं की, ती तिच्या क्लासमेटला भेटण्यासाठी तिच्या घरी जात आहे. असं खोटं बोलून ती हत्येतील आरोपींपर्यंत पोहोचली होती. अंबिका सतत कपिल आणि या केसमधील इतर आरोपींना भेटत राहिली होती. नंतर त्यांनी 'बकरा'च्या हत्येचा प्लॅन केला होता.
 

Web Title: First girl gangster of Jammu Kashmir Ambika aka Bindu played key role in murder of don Sanjay Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.