आधी भिंतीवर मजकूर लिहिला, नंतर गळफास घेतला, ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 23:37 IST2021-11-22T23:37:21+5:302021-11-22T23:37:42+5:30
Crime News: ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) या मनपा सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री रामेश्वर काॅलनीतील मंगलपुरीत उघडकीस आली.

आधी भिंतीवर मजकूर लिहिला, नंतर गळफास घेतला, ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या
जळगाव : ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) या मनपा सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री रामेश्वर काॅलनीतील मंगलपुरीत उघडकीस आली. भीमराव याने आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवर लल्ला सरपटे याच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा मजकूर लिहिला आहे. त्याशिवाय मदतीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिस कर्मचाऱ्यांचा नंबर दिलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमराव हा महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता सोमवारी सायंकाळी तो कामावरून घरी परतला.
वरच्या मजल्यावर जाऊन झोपला वडील रमेश तिलोरे चहासाठी बोलवण्यास गेले असता त्याने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.हा प्रकार लक्षात आल्यानंतर वडील व इतर नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार रामकृष्ण पाटील व संदीप धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. भीमराव याचा घटस्फोट झालेला होता. माझ्या आत्महत्येला लल्ला जबाबदार आहे घरच्यांना जबाबदार धरू नये असे भिंतीवर लिहून ठेवलेले आहे. त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.