आधी ठार केलं, मग श्रद्धा हत्याकांडाची आयडिया घेत मृतदेहाचे १० तुकडे केले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 09:53 AM2022-12-18T09:53:07+5:302022-12-18T09:53:57+5:30
अलीकडेच दिल्लीत श्रद्धा हत्याकांडाचे प्रकरण समोर आले आहे. त्यात त्या आरोपी आफताबने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचे ३५ तुकडे कसे केले, हे वाचले होते.
जयपूर - राजस्थानच्या जयपूर इथं ६४ वर्षीय महिलेच्या हत्येचा पोलिसांनी खुलासा केला आहे. ही हत्या वृद्ध महिलेच्या भाच्याने केली आहे. किरकोळ वादातून आरोपीने आजीची हत्या केली, मात्र त्यानंतर श्रद्धाच्या खून प्रकरणात आयडिया घेऊन त्याने मृतदेहाचे १० तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी आरोपीने सांगितलेल्या तीन ठिकाणांहून आठ तुकडे जप्त केले आहेत, मात्र दोन तुकड्यांचा शोध सुरू आहे. जयपूर पोलिसांचे डीसीपी नार्थ पारीस देशमुख यांनी ही माहिती दिली.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, मला दिल्ली कीर्तनाला जायचे होते, पण आजी नकार देत होत्या. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. यादरम्यान रागाच्या भरात त्याने आजीला मारले. अलीकडेच दिल्लीत श्रद्धा हत्याकांडाचे प्रकरण समोर आले आहे. त्यात त्या आरोपी आफताबने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचे ३५ तुकडे कसे केले, हे वाचले होते. या घटनेने आयडिया घेत आरोपीने आपल्या आजीच्या मृतदेहाचेही १० तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावली
आरोपी इंजिनिअर
डीसीपी नार्थ परिस देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अनुज शर्मा असे असून तो विद्याधर नगर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. बीटेक केल्यानंतर तो एका खासगी कंपनीत इंजिनिअर म्हणून कामाला आहे. कुटुंबातील सदस्य ११ डिसेंबरला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी इंदूरला गेले होते. त्याच दिवशी अनुजने आपली आजी सरोज शर्मा यांना कीर्तनासाठी दिल्लीला जायचे असल्याचे सांगितले. मात्र सरोज शर्माने यासाठी नकार दिल्याने आरोपीने तिची हत्या केली.
आजी गायब झाल्याची केली तक्रार
आरोपीने स्वत: आजीच्या बेपत्ताबद्दल तक्रार नोंदवली असं पोलिसांनी म्हटलं. त्याने सांगितले की, त्याची आजी कर्करोगाने ग्रस्त असून मंदिराबाहेरून बेपत्ता झाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपीच्या घरातून रक्ताचे काही डाग आढळून आले. हे संशयास्पद वाटले आणि पोलिसांनी प्रथम तक्रारदाराची चौकशी केली. यामध्ये ही बाब उघड झाली.