लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भांडाफोड झाल्यावर पती 'कोमात' आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:00 PM2022-12-28T13:00:00+5:302022-12-28T13:00:41+5:30

Crime News : दरगाहपुर गावात राहणाऱ्या 30 वर्षीय सुखलाल नावाच्या तरूणाची सोशल मीडियावर हरयाणाच्या एका तरूणीसोबत ओळख झाली आणि दोघेही चॅटींग करू लागले होते.

First night of marriage husband found that his wife is transgender and register fraud case | लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भांडाफोड झाल्यावर पती 'कोमात' आणि मग...

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भांडाफोड झाल्यावर पती 'कोमात' आणि मग...

googlenewsNext

Crime News : लव्ह मॅरेजनंतर पती-पत्नीमध्ये वाद, अनैतिक संबंध आणि इतरही अनेक कारणांमुळे लग्न मोडताना तुम्ही पाहिलं असेल, पण हरिद्वारच्या लक्सरमध्ये पत्नीच्या जेंडरचा खुलासा झाल्यामुळे एका तरूणाने पोलिसात तक्रार दिली आहे. तरूण ज्या तरूणीला पत्नी बनवून घरी घेऊन आला ती  ट्रांसजेंडर निघाली.

दरगाहपुर गावात राहणाऱ्या 30 वर्षीय सुखलाल नावाच्या तरूणाची सोशल मीडियावर हरयाणाच्या एका तरूणीसोबत ओळख झाली आणि दोघेही चॅटींग करू लागले होते. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

दोघांच्या कुटुंबियांच्या परवानगीनंतर लक्सरच्या राधा कृष्ण मंदिरात दोघांनी लग्न केलं. पण सगळा घोळ लग्नाच्या पहिल्या रात्री झाला.  लग्नाच्या पहिल्या रात्री तरूणाला समजलं की, त्याची पत्नी ट्रांसजेंडर आहे आणि ती मुलाची मुलगी झाली आहे. तेव्हा त्याला धक्का बसला. 
आपल्या पत्नीच्या जेंडरबाबत समजल्यावर त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. यावरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर त्याची पत्नी तिच्या घरी हिसारला परत गेली.

तरूणाने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, त्याची पत्नी आरूषीचं नाव आधी आशु होतं आणि ती पुरूषाची महिला झाली होती. तरूणाने आरूषिच्या परिवारावर फसवणूक आणि घटस्फोट देण्यासाठी मोठी रक्कम मागितल्याचाही आरोप केला आहे. त्यांच्या विरोधात तरूणाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: First night of marriage husband found that his wife is transgender and register fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.