पुणे जिल्ह्यातील तिहेरी तलाक प्रकरणातला पहिला गुन्हा बारामतीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:14 PM2019-08-06T21:14:52+5:302019-08-06T21:19:14+5:30
फिर्यादीच्या मुलीची नांदण्याची इच्छा आहे.तरी देखील आरोपीने नोटीस द्वारे तिचे चारित्रहीन शब्दांमध्ये तिचे अब्रूवर आरोप केलेले आहे..
बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला विवाह वरील हक्काचे संरक्षण कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेला तिहेरी तलाक प्रकरणातील गुन्हा राज्यातील पहिला गुन्हा असल्याची शक्यता पोलिसांनी केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पीडित महिलेच्या शिर्सुफळ(ता बारामती) येथील वडिलांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सॉप्टवेअर इंजिनिअर असलेल्या शादाब इब्राहिम जमादार (रा. वुड अपार्टमेंट,कडनगर,बिल्डींग नंबर के १,प्लॅट नं ३०१ उंड्री, ता. हवेली) याच्याविरूध्द बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या मुलीशी आरोपी शादाब जमादार याचा विवाह झालेला आहे.फिर्यादीच्या मुलीची नांदण्याची इच्छा आहे.तरी देखील आरोपीने सदर नोटीस द्वारे फिर्यादी मुलीची तलाक देण्याची इच्छा नसतानाही तिस तलाक पाठवून चारित्र्यहनन असे अपशब्द वापरून तिची अब्रूवर आरोप केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. तिहेरी तलाकचा कायदा ३१जुलै २०१९ रोजी नुकताच संमत झाला आहे. या पार्श्वभुमीवर आज बारामती पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा राज्यातील पाहिलाच गुन्हा असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शादाब जमादार याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस हवालदार भानुदास बंडगर करत आहेत.
—————————