मुंबईत पहिल्याच पावसात ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 05:59 PM2019-06-28T17:59:10+5:302019-06-28T18:05:02+5:30

या पावसादरम्यान काही ठिकाणी शॉर्टसर्किट, झाडं कोसळणे यासारख्या घटना

In The first rain in Mumbai three people has killed | मुंबईत पहिल्याच पावसात ३ जणांचा मृत्यू

मुंबईत पहिल्याच पावसात ३ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे राजेंद्र यादव (६) आणि संजय यादव (२४) अशी या मृत दोघांची नावं आहेत.  या पावसादरम्यान काही ठिकाणी शॉर्टसर्किट, झाडं कोसळणे यासारख्या घटना घडल्या असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  काशिमा युडियार (६०) महिलेचा विजेचा धक्काला लागून मृत्यू झाला.

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून काही ठिकाणी माध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसादरम्यान काही ठिकाणी शॉर्टसर्किट, झाडं कोसळणे यासारख्या घटना घडल्या असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई शहरात एका ठिकाणी, पूर्व उपनगरात २ तर पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा एकूण ९ शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळची ७.४८ वाजताच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील अण्णा नगर, आरटीओ ऑफिससमोर काशिमा युडियार (६०) महिलेचा विजेचा धक्काला लागून मृत्यू झाला. तर गोरेगाव पूर्व येथे महाकाली केव्ह्स रोड येथे सकाळची ७.५६ वाजताच्या दरम्यान विजेचा धक्का बसून चार व्यक्ती जखमी झाल्या होत्या. मात्र, उपचारादरम्यान चारपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र यादव (६) आणि संजय यादव (२४) अशी या मृत दोघांची नावं आहेत. 

अंधेरी पश्चिमेकडील अण्णा नगर येथे आज सकाळची ७.४८ वाजताच्या सुमारास काशिमा युडियार या महिलेला विजेचा धक्का बसला. उपचारासाठी जखमी महिलेस कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच गोरेगाव येथे महाकाली केव्ह्स रोड परिसरात विजेचा धक्का बसून राजेंद्र यादव, संजय यादव, आशादेवी यादव आणि दिपू यादव या चार व्यक्ती जखमी झाल्या. पोलिसांनी या चौघांना उपचारासाठ ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठविले. त्यावेळी चारपैकी राजेंद्र यादव आणि संजय यादव यांना मृत घोषित करण्यात आले तर आशादेवी यादव (५) आणि दिपू यादव (२४) या दोघांची प्रकृती स्थिर आहे. 

Web Title: In The first rain in Mumbai three people has killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.