पहिल्यांदा महिला IPSच्या खांद्यावर नक्षल ऑपरेशनची कमान, रवीना टंडन म्हणाली.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:06 PM2021-12-29T17:06:25+5:302021-12-29T17:07:03+5:30

IPS Ankita Sharma : एका सोशल मीडिया यूजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'बस्तरमध्ये पहिल्यांदाच नक्षल ऑपरेशनची कमान महिला आयपीएसच्या हाती आहे.' खुद्द आयपीएस अंकिता शर्मानेही रवीना टंडनच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "खूप खूप धन्यवाद"

For the first time, a female Naxal operation was carried out on the shoulders of IPS, said Raveena Tandon .... | पहिल्यांदा महिला IPSच्या खांद्यावर नक्षल ऑपरेशनची कमान, रवीना टंडन म्हणाली.... 

पहिल्यांदा महिला IPSच्या खांद्यावर नक्षल ऑपरेशनची कमान, रवीना टंडन म्हणाली.... 

googlenewsNext

रायपूर - छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकारने रायपूरच्या शहर एसपी असलेल्या IPS अधिकारी अंकिता शर्मा यांची नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्याचे ASP पदी नियुक्ती केली आहे. छत्तीसगडच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांनी नक्षल ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर लोकांनी त्यांना स्टार म्हणूनही गौरविले. बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडननेही तिचे खूप कौतुक केले आहे. एवढेच नाही तर रवीना टंडनने तिला खरी हिरोईन म्हटले आहे.

एका सोशल मीडिया यूजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'बस्तरमध्ये पहिल्यांदाच नक्षल ऑपरेशनची कमान महिला आयपीएसच्या हाती आहे.' खुद्द आयपीएस अंकिता शर्मानेही रवीना टंडनच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "खूप खूप धन्यवाद"



जाणून घ्या! कोण आहेत IPS अधिकारी अंकिता शर्मा?

अंकिता शर्मा २०१८ बॅचच्या आयपीएस बॅचची अधिकारी आहेत . त्यांचा जन्म छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झाला. अंकिता शर्मा यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग सुरू करून प्रसिद्धीच्या झोतात आली. अंकिता शर्मा यांना छत्तीसगडची पहिली महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मानही मिळाला आहे. २०१८ च्या UPSC परीक्षेत अंकिता शर्माने 203 रँक मिळवले, तर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश लाभले. अंकिताला नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्याची एएसपी बनवण्यात आली आहे. सरकारने त्यांच्यावर ऑपरेशन बस्तरची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.


अंकिता शर्माने छत्तीसगडच्या प्रशासकीय विभागात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना एक दबंग आणि जिगरबाज पोलीस अधिकारी मानले जाते. अतिशय सक्रिय अधिकारी म्हणून अंकिता शर्मा यांची ओळख आहे. त्यांना घोडेस्वारी आणि बॅडमिंटनचीही आवड आहे. त्या अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अंकिता यांनी यावर्षी प्रजासत्ताक दिनी रायपूरमध्ये परेडचे नेतृत्व केले. IPS अंकिता शर्मा छत्तीसगडच्या इतिहासात प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करणारी पहिली महिला पोलीस अधिकारी ठरली आहे.

 

 

Web Title: For the first time, a female Naxal operation was carried out on the shoulders of IPS, said Raveena Tandon ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.