ही माझी दुसरी बायको! नवऱ्यानं पहिल्या बायकोला करून दिली ओळख; पहिल्या बायकोकडून जोरदार 'स्वागत'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:03 PM2021-05-25T12:03:45+5:302021-05-25T12:11:06+5:30

पहिली बायको आणि तिच्या भावांकडून नवरदेवाचं जोरदार स्वागत

first wife beats husband after he comes home after second marriage | ही माझी दुसरी बायको! नवऱ्यानं पहिल्या बायकोला करून दिली ओळख; पहिल्या बायकोकडून जोरदार 'स्वागत'

ही माझी दुसरी बायको! नवऱ्यानं पहिल्या बायकोला करून दिली ओळख; पहिल्या बायकोकडून जोरदार 'स्वागत'

googlenewsNext

लखीसराय: दोन बायका अन् फजिती ऐका याचा प्रत्यय बिहारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आला आहे. लखीसरायमध्ये वास्तव्यास अससेल्या एका विवाहित पुरुषाला दुसरं लग्न करणं महागात पडलं आहे. दोन्ही पत्नींनी मिळून झाडू आणि चपलांनी त्याची धुलाई केली आहे. लखीसरायच्या मेदनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमरपूर गावात हा प्रकार घडला. आरोपीला एक पत्नी आणि तिच्याकडून एक मुलगी असताना त्यानं दुसरा विवाह केला. 

आरोपी रुपेश कुमार नव्या नवरीला घेऊन घरी आला. त्यानं त्याच्या पहिल्या पत्नीला तिचं स्वागत करण्यास सांगितलं. त्यामुळे दुसरी पत्नी संतापली. तिनं तिच्या भावांना बोलावलं. सगळ्यांनी मिळून झाडू, चपलांनी रुपेशची धुलाई केली. रुपेशच्या दुसऱ्या पत्नीनंदेखील त्याला बदडलं. तिथे उपस्थित असलेल्या एकानं घटनेचं चित्रीकरण केलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

३ बायका फजिती ऐका! मुलानं 'पप्पा' म्हणून हाक मारताच पठ्ठ्याचं सगळं बिंग फुटलं, त्यानंतर जे घडलं...

रुपेश कुमारचा पहिला विवाह तीन वर्षांपूर्वी झालं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे. मात्र तरीही रुपेशनं दुसरा विवाह केला. मुंगेर जिल्ह्यातील धरहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाहाचौकी गावात त्यानं स्वत: अविवाहित असल्याचं सांगून लग्न केलं. यानंतर तो नव्या नवरीला घेऊन पहिल्या पत्नीकडे आला. घरी पोहोचल्यावर नव्या नवरीला तिची फसवणूक झाल्याचं समजलं. तिनं सोबत राहण्यास नकार दिला. दुसऱ्या पत्नीनंदेखील तिच्या भावाला बोलावलं. त्यानंतर सगळ्यांनी मिळून रुपेशची धुलाई केली.

Web Title: first wife beats husband after he comes home after second marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.