आधी खुनाच्या कारणाची ऑडीओ क्लीप केली व्हायरल; नंतर केले पत्नीचे मुंडके धडा वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:23 PM2018-08-16T14:23:54+5:302018-08-16T15:00:35+5:30

चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीच्या सहाय्याने पत्नीचे झोपेतच मुंडके धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी रात्री घडली.

Firstly the husband spreads murder cause then kills wife | आधी खुनाच्या कारणाची ऑडीओ क्लीप केली व्हायरल; नंतर केले पत्नीचे मुंडके धडा वेगळे

आधी खुनाच्या कारणाची ऑडीओ क्लीप केली व्हायरल; नंतर केले पत्नीचे मुंडके धडा वेगळे

googlenewsNext

सिल्लोड/आमठाणा (औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीच्या सहाय्याने पत्नीचे झोपेतच मुंडके धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. मृत महिलेचे नाव मंगलाबाई रवींद्र बनकर (30 ) असे असून या प्रकरणी पोलिसांनी पती, सासरा- सासू, दीर-जाऊ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र साहेबराव बनकर (३०) याचे १० वर्षापूर्वी मंगलाबाई यांच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. काही दिवसांपासून रवींद्र याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने तिला दोन तीन वेळेस परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत पकडले होते. यानंतर त्याने मंगलाबाईची समजूत घालतली होती. मात्र तिच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नसल्याने रवींद्रचा राग राग अनावर झाला. यातच रवींद्रने मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास मंगलाबाई झोपेत असताना तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. अत्यंत कुर्रपणे वार करत त्याने पत्नीचे मुंडके धडा वेगळे केले. यानंतर रवींद्र फरार झाला असून पोलिसांनी खून करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड ताब्यात घेतली आहे. 

मृत मंगलबाईचे वडील सूर्यभान किसन सुसूद्रे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी रवींद्र बनकर, सासरा साहेबराव बनकर, सासू लंकाबाई, दीर अशोक, जाऊ शितल अशोक बनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सासरा साहेबराव व दीर अशोक यांना ताब्यात घेतले आहे. 

क्लिप केली व्हायरल
आरोपी रवींद्रने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी कॉल रेकॉर्डींगची मदत घेतली. त्याने खून करण्यापूर्वी एका मित्राच्या सहायाने मंगलाबाईशी फोनवर कॉन्फरन्सद्वारे संभाषण केले. यातून तिच्याकडून तिचे अनैतिक संबंध असल्याचे कबुल करून घेतले. यानंतर रात्री बारा वाजता ही ऑडीओ क्लिप त्याने काही ग्रुपवर व्हायरल केली. यानंतर मध्यरात्री त्याने पत्नीचा खून केला. 

Web Title: Firstly the husband spreads murder cause then kills wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.