इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधील कॉपर व ऑइल चोरी करणारे पाच आरोपी गजाआड, ५ गुन्ह्यांची केली उकल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 03:54 PM2022-08-13T15:54:37+5:302022-08-13T15:55:54+5:30

Crime News: महावितरणच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधून कॉपर, ऑईल चोरी करणाऱ्या ५ आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदाराना यश मिळाले आहे.

Five accused who stole copper and oil from electric transformer, Gajaad, | इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधील कॉपर व ऑइल चोरी करणारे पाच आरोपी गजाआड, ५ गुन्ह्यांची केली उकल

इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधील कॉपर व ऑइल चोरी करणारे पाच आरोपी गजाआड, ५ गुन्ह्यांची केली उकल

Next

-मंगेश कराळे 

नालासोपारा - महावितरणच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधून कॉपर, ऑईल चोरी करणाऱ्या ५ आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदाराना यश मिळाले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून ५ गुन्ह्यांची उकल करून लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ ते २५ मार्च दरम्यान धुमाळ नगर येथील न्यूवान इंडस्ट्रीज येथील महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधून ऑईल, कॉईल चोरीला गेले होते. अजय भुयाळ (३१) यांनी २५ मार्चला पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि इतर ठिकाणी महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधून साहित्य चोरी होत असल्याने पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. गुन्ह्याच्या घटना स्थळावरील तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मैनूद्दीन खान (२८), इबरार चौधरी (२९), सनुप तिवारी उर्फ सोनू पंडित (२४), जुमाई शेख (६५) आणि प्रतापसिंह उदयसिंह (५०) या आरोपींना ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रेस नोट काढून दिली आहे.

पोलिसांनी या आरोपीकडून चोरीला गेलेले कॉपर वायडिंग तार व ऑईल तसेच गुन्हा करण्याकरिता वापरलेले वाहन असा एकूण ५ लाख ३३ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी लोकमतला दिली.

Web Title: Five accused who stole copper and oil from electric transformer, Gajaad,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.