पाच दिवसांनी मिळाला नाल्यात वाहून गेलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 08:48 PM2021-07-22T20:48:17+5:302021-07-22T20:48:57+5:30
Crime News : हा मृतदेह कळवा पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन शवविच्छेदनाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे - आंबेडकर रोड, कोर्टनाका, ठाणे (प.) याठिकाणी १७ जुलै २०२१ रोजी पहाटे ०२:०० वा. सुमारास जीवन ओहाळ याने नाल्यामध्ये उडी मारली होती. तरी त्याचा मृतदेह नाल्यात वाहून गेल्याने मागील ४ दिवसापासून आतापर्यंत प्रा. आ. व्य.कक्ष, अग्निशमन विभाग आणि TDRF च्या मदतीने शोधकार्य सुरू होते.
आज दिनांक २२ जुलै २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजता गणेश विसर्जन घाट जवळ, विटावा याठिकाणी खाडीमध्ये जीवन ओहाळ (३६ ,रहाणार: आंबेडकर नगर, कोर्टनाका) व्यक्तीचा मृतदेह TDRF पथकाला सापडला. हा मृतदेह कळवा पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन शवविच्छेदनाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.