काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:55 PM2022-03-11T20:55:56+5:302022-03-11T22:13:53+5:30

Big Accident : ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते.

Five devotees killed on the spot while returning from Gangapur; Two serious | काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

Next

देवदर्शन करून परतताना कार झाडाला आदळून पाच ठार,दोघे जखमी

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक कुटुंबीय कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथील श्री दत्ताचे देवदर्शन करून परतीचा प्रवास करीत होते. दरम्यान टायर फुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यात पाच जण जागेवर ठार झाले तर दोघेजण गंभीरजखमी झाले आहेत. ही घटना दि.११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याबाबत अफझलपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अनव्वा हिराबाई बडे, छाया बाबासाहेब वीर (वय ५० रा.सर्व रा. अहमदनगर) असे पाचजण जागेवर ठार झाले आहेत तर सायली बाबासाहेब वीर (वय १३), चैत्राली दिनकर सूर्यवंशी (वय ०२) या दोघी गंभीर जखमी झाले आहेत. अहमदनगर येथून कारने गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. मनोभावे दर्शन करून संपूर्ण कुटुंब परतीचा प्रवास करीत होते. अफझलपूर तालुक्यातील बळोरगी गावाजवळील गुत्तेदार यांच्या शेताजवळ येताच कारचा पुढचा टायर फुटला. तेव्हा कार फरफटत रोडच्या कडेला असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. वेगात असलेल्या कारची समोरची बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. त्यामधील पाचजण जागेवर ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अफझलपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन रीतसर पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Five devotees killed on the spot while returning from Gangapur; Two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.