कै द्याकडे नशेच्या गोळ्यांसह पाचशेच्या पाच नोटा, कारागृह सुरक्षेला सुरुंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:26 AM2018-12-22T06:26:13+5:302018-12-22T06:26:27+5:30
मोक्कासारख्या गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी कैदी असलेल्या पुनीत उर्फ अजय तिवारी (३०) याच्याकडे नशेच्या सहा गोळ्या तसेच ५०० रुपयांच्या पाच नोटा असे अडीच हजार रुपये सापडल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उघडकीस आली.
ठाणे : मोक्कासारख्या गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी कैदी असलेल्या पुनीत उर्फ अजय तिवारी (३०) याच्याकडे नशेच्या सहा गोळ्या तसेच ५०० रुपयांच्या पाच नोटा असे अडीच हजार रुपये सापडल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे ठाणे कारागृहाच्या सुरक्षेला सुरुंग लागल्याची चर्चा आहे. तसेच या प्रकरणी गुरुवारी रात्री ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीकडून त्या गोळ्या आणि पैसे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गुन्ह्यातील पुनीत हा ३१ जुलै २०१२ पासून ठाणे कारागृहात न्यायबंदी कैदी आहे. गुरुवारी बॅरेक नंबर २ मध्ये असलेल्या कैद्यांमध्ये पुनीतकडे नशेच्या गोळ्या असल्याची कुजबुज सुरू होती. ती एका कारागृह कर्मचाऱ्याच्या कानांवर आली. त्यानुसार, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पांढºया रंगाच्या सहा गोळ्या एक पिशवीत मिळून आल्या. तर, दुसºया पिशवीत गुंडाळी केलेल्या ५०० रुपयांच्या पाच नोटाही मिळून आल्या. या प्रकरणी कारागृह शिपाई महेश गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुनीतविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी दिली.
१५ डिसेंबर रोजी त्याला ठाणे न्यायालयात आणण्यात आले होते. त्या वेळी परतताना त्याने त्या वस्तू कारागृहात नेल्या असाव्यात. मात्र, कारागृहात नेताना प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. यामुळे त्याने या वस्तू कशा नेल्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याबाबत तपासासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याचा ताबा घेऊन त्याला अटक केली जाणार आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.