हिंदू कटुंबातील पाच सदस्यांची गळा चिरून हत्या, पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचारात वाढ
By पूनम अपराज | Published: March 7, 2021 09:27 PM2021-03-07T21:27:49+5:302021-03-07T21:30:22+5:30
Murder in pakistan : ही घटना घडवून आणणार्या मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्या सामूहिक हत्येचं खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हिंदू कुटुंबातील ५ जणांचा गळा चिरून खून केला. या घटनेपासून पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांमध्ये भीती पसरली आहे. हे हिंदू कुटुंब मुलतानजवळील रहीम यार खान शहरापासून १५ कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होते. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह आणखी काही शस्त्रे जप्त केली. ही घटना घडवून आणणार्या मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अशी माहिती एपीबी हिंदीने दिली आहे.
मेघवाल हे हिंदू कुटुंब होते
रहिम यार खान यांचे सामाजिक कार्यकर्ते बिरबल दास यांच्या मते, या कुटुंबाचा प्रमुख राम चंद ३५-३६ वर्षांचा होता आणि तो बराच काळ आपले टेलरचे दुकान चालवत होते. राम चंद आणि त्यांचे कुटुंब एक अतिशय शांत आणि आनंदी जीवन जगत होते. अशा परिस्थितीत ही घटना सर्वांनाच धक्कादायक आहे.
हिंदूंवर अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे
अल्पसंख्याक हिंदू आणि शीख यांच्यावरील अत्याचाराच्या घटना पाकिस्तानमध्ये सतत वाढत आहेत. सुमारे ६ महिन्यांपूर्वी कराचीमधील एका हिंदू डॉक्टरचीही अज्ञात लोकांनी चाकूने निर्घृण हत्या केली होती. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असून तो सिंध प्रांतातील तांदो अल्यहार येथे सराव करीत असे. पाकिस्तानमध्येच १९४७ पासून अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांचा छळ सुरू आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारावे व त्यानंतर मुस्लिम तरुणांसह त्यांचे लग्न करावयास हिंदू-शिखांमध्ये सामान्य गोष्ट आहे. हिंदू-शीख या विषयावर बर्याच काळापासून आवाज उठवत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांच्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.