पाच महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाची पोलिसांनी केली उकल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:20 PM2018-09-17T21:20:01+5:302018-09-17T21:20:18+5:30

मुंबई शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, सी.आय.डी. पुणे या भागातील हरवलेल्या क्यक्तींचा शोध सुरू केला. यामध्ये भांडुपचा शेगर पिल्ले गायब असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिली होती. मात्र, मृतदेह सडल्यामुळे ओळख पटत नव्हती. शेवटी या महिलेच्या मुलाचा व मृतदेहाचा डीएनए जुळून आला.

Five minutes ago, the police took action against the killers | पाच महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाची पोलिसांनी केली उकल 

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाची पोलिसांनी केली उकल 

Next

ठाणे - मशीन विकून त्याचे पैसे मित्राला परत न करता त्याचा खून करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या कक्ष पाचने अटक केली आहे. त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी वागळे इस्टेट येथील बुश कंपनीजवळ झालेल्या खुनाचा उलगडा झाला असून शेगर पिल्ले (वय 40) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अटक केलेल्या ग्रीजेश सिंह व प्रमोदकुमार गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक 21 वर पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आला होता. मात्र, त्याची ओळख पटत नसल्याने पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. याबाबत कोणताही पुरावा नसताना कक्ष पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणकरे यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांना तपासाची जबाबदारी दिली. त्यांनी विविध पथके तयार करून मुंबई शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, सी.आय.डी. पुणे या भागातील हरवलेल्या क्यक्तींचा शोध सुरू केला. यामध्ये भांडुपचा शेगर पिल्ले गायब असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिली होती. मात्र, मृतदेह सडल्यामुळे ओळख पटत नव्हती. शेवटी या महिलेच्या मुलाचा व मृतदेहाचा डीएनए जुळून आला. त्याआधारे त्याच्या मित्रांच्या चौकशीतून आरोपी ग्रीजेश सिंह व प्रमोदकुमार गुप्ता यांची नावे समोर आली. त्यांनीच पिल्लेकडून लेथ मशीन किकत घेऊन त्याचे पैसे थककले होते. त्यावरून पिल्ले सिंहला सतत शिविगाळ करून त्याच्याशी भांडण करत होता. यावरूनच त्याने गुप्ता याच्या मदतीने पिल्ले यांचा दोरीने गळा आवळून खून केला, तर हा मृतदेह पोत्यात भरून बुश कंपनीसमोर फेकल्याची कबुली दिली.

Web Title: Five minutes ago, the police took action against the killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.