पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, उल्हासनगरात मोटरसायकल चोराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:22 IST2022-02-24T18:21:24+5:302022-02-24T18:22:04+5:30

Crime News : शहरात मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले असून मोठी गॅंग कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. 

Five motorcycle seized by police, motorcycle thieves arrested in Ulhasnagar | पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, उल्हासनगरात मोटरसायकल चोराला अटक

पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, उल्हासनगरात मोटरसायकल चोराला अटक

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका मोटरसायकल चोराला सापळा रचून अटक केली असून त्याच्याकडून ५ मोटरसायकली हस्तगत केल्या. शहरात मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले असून मोठी गॅंग कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले हे एका मोटरसायकल चोरीचा समांतर तपास करीत असतांना, त्यांना गुप्त महितीद्वारे एक मोटरसायकल चोर शहाड ब्रिज खाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विभागाने सापळा रचून चोरीच्या मोटरसायकलसह आनंद कनौजिया याला अटक केली. त्याला बोलते केले असता तीन मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकून ५ मोटरसायकली हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. आनंद कनौजिया याच्याकडून अधिक चोरीचे गुन्हे उघड होतात का? याकडे अन्वेषण विभाग तपास करीत असून दुचाकी चोरणारी मोठी गॅंग शहरात कार्यरत असल्याची टीका होत आहे. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहेत.

Web Title: Five motorcycle seized by police, motorcycle thieves arrested in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.