दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:06 AM2023-04-14T11:06:50+5:302023-04-14T11:07:20+5:30

गुरुवारी रात्री चोपड्यानजीक सत्रासेन घाटात करण्यात आली कारवाई

Five people arrested with two Gavathi Kattas five live cartridges in Chopda Jalgaon | दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक

दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक

googlenewsNext

शाय जाधव, चोपडा (जि.जळगाव): चारचाकी वाहनातून  देशी बनावटीचे दोन कट्टे, पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री चोपड्यानजीक सत्रासेन घाटात करण्यात आली. किरण कमलाकर शिंदे (२४, रा.लासलगाव ता.निफाड), टिनू उर्फ दशरथ रामचंद्र पवार (३५), रामचंद्र विश्वनाथ दाभाडे (३०), युवराज भगवान माळे (२६), केशव बंडूजी वखरे (४६, सर्व रा. पिंपळगाव बसवंत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पो.नि.कावेरी कमलाकर, पो.कॉ.राकेश पाटील, लक्ष्मण शिंगाणे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Five people arrested with two Gavathi Kattas five live cartridges in Chopda Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.