भाजप नेत्यासह पाच जणांवर गॅंगरेपचा आरोप, पीडितेचे अपहरण करून केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 09:38 PM2022-07-01T21:38:03+5:302022-07-01T21:38:50+5:30
Gangrape Case : आरोपींमध्ये भाजप नेते आयटी सेलचे जिल्हा प्रभारी असल्याचे सांगितले जाते.
आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बरहान पोलीस ठाण्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी भाजप नेत्यासह पाच जणांवर मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच जणांचा समावेश असून, 12 अज्ञातांचा समावेश आहे. आरोपींमध्ये भाजप नेते आयटी सेलचे जिल्हा प्रभारी असल्याचे सांगितले जाते.
बरहान पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील रहिवासी असलेली ही तरुणी एतमादपूर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघाली होती. भाजप नेते भोला सिंह यांनी रस्त्यात अडवून तिला गाडीत बसवले असा आरोप आहे. त्यानंतर तो पीडितेला घेऊन गाझियाबादला गेला. जिथे तिच्यावर भोला सिंग आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. तक्रार करूनही लक्ष दिले नसल्याचे पीडितेच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी एसएसपी यांची भेट घेतली. एसएसपीच्या आदेशानंतर बरहान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे पोलीस स्टेशन प्रभारी शेर सिंह यांनी सांगितले.
आरोपींनी तिचे अपहरण करून कारमधून नेले
पीडितेच्या वडिलांनी एसएसपीला सांगितले की, 29 मे रोजी त्यांची मुलगी एतमादपूर कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. शोध घेतल्यानंतर त्यांच्या मुलीचे अपहरण भाजप नेते भोला सिंग याने केल्याचे आढळून आले. भोलाच्या गाडीत आणखी तीन-चार जण बसले होते. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. 1 जून रोजी त्यांची मुलगी सादाबादजवळील सरोत गावात एका जर्जर हॉलमध्ये सापडली होती, तिने सांगितले की, भोला सिंग कॉलेजच्या बाहेर आला. गावाला घेऊन जायचे सांगून मला गाडीत बसवले. कारमध्ये ती बेशुद्ध पडली. यानंतर तिला गाझियाबादला नेण्यात आले, जिथे सामूहिक बलात्कार झाला. विरोध केल्याने त्यांना मारहाणही करण्यात आली.
आर्य समाजाच्या मंदिरात लग्न झाले
आरोपी भाजप नेता पीडितेला अनेक महिन्यांपासून त्रास देत होता. पीडितेचे लग्नही ठरले होते, मात्र भाजप नेते तिला लग्न करू देत नव्हते. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर त्यांनी 30 मे रोजी आर्य समाज मंदिरात जबरदस्तीने लग्न केले. विरोध केल्यावर, तिच्यासोबत स्वतःला भाजपचा नेता म्हणून गुंडगिरी करू लागला.