"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:00 IST2025-04-19T12:00:25+5:302025-04-19T12:00:51+5:30
जमिनीच्या वादातून गुंडांनी पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपींनी लहान मुलाचा मृतदेह त्याच्या आईला दिला.

"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
बिहारमधील बेगुसराय येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून गुंडांनी पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपींनी लहान मुलाचा मृतदेह त्याच्या आईला दिला आणि म्हणाला, "हे बघ, तुझा मुलगा मेला." घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
मुलगा बिस्किट आणण्यासाठी गेलेला दुकानात
बेगुसरायच्या रिफायनरी पोलीस स्टेशन परिसरातील चकबल्ली गावातील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये ही घटना घडली आहे. मुलाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोलू घरातून १० रुपये घेऊन जवळच्या दुकानातून बिस्किट खरेदी करण्यासाठी गेला होता. शेजारी राहणाऱ्या बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबीयांनी त्याची धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी चकबल्ली गावाचा रस्ता रोखून गोंधळ घातला.
जमिनीवरून सुरू होता वाद
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबासोबत जमिनीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. आरोपी अनेकदा तुमच्या मुलाला मारून टाकेन अशी धमकी देत असत.
"हे बघ, तुझा मुलगा मेला"
मुलाीची आई रिंकू देवी यांनी आरोप केला आहे की, गोलू घरातून पैसे घेऊन बाहेर गेला होता. बिस्किट खरेदी करण्यासाठी १० रुपये नेले होते. थोड्या वेळाने, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबातील एक महिला गोलूचा मृतदेह घेऊन आली आणि हे बघ, तुझा मुलगा मेला असं म्हणाली. आरोपीने गोलूच्या डोक्यात खिळा ठोकून त्याची हत्या केली. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.