इच्छा नसतानाही विमान कर्मचाऱ्यांनी ‘त्याला’ आणले, लघुशंका प्रकरणातील पीडितेने सांगितला प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 08:43 AM2023-01-07T08:43:48+5:302023-01-07T08:44:04+5:30

 पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यात पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या इच्छेविरुद्ध तिला प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीशी बोलण्यास सांगितले होते. 

Flight attendants brought 'him' against his will, incident recounted by victim in Air India flight urination case | इच्छा नसतानाही विमान कर्मचाऱ्यांनी ‘त्याला’ आणले, लघुशंका प्रकरणातील पीडितेने सांगितला प्रसंग

इच्छा नसतानाही विमान कर्मचाऱ्यांनी ‘त्याला’ आणले, लघुशंका प्रकरणातील पीडितेने सांगितला प्रसंग

Next

नवी दिल्ली : विमानात अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला विमान कर्मचाऱ्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध समोर आणले, आणि प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला,  त्यामुळे धक्का बसला, असा अनुभव त्या पीडित महिलेने सांगितला. आरोपीला समोर आणल्यानंतर तो रडायला लागला आणि माफी मागू लागला, असेही त्या म्हणाल्या.

पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यात पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या इच्छेविरुद्ध तिला प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीशी बोलण्यास सांगितले होते. 

यानंतर महिलेने तो प्रसंग नेमका कसा घडला हे सविस्तर सांगितले. या प्रवासात घटनेनंतर जो मनस्ताप झाला, त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त 
केली. त्यांच्या जावयाने २७ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाकडे तक्रार पाठवली आणि विमान कंपनीने तिकिटाचे पैसे परत करण्याचे मान्य केले. मात्र, त्यातील काही भागच परत करण्यात आला, असा दावाही महिले केला.

प्रत्येक अनुचित वर्तनाची तक्रार करा
कर्मचाऱ्यांनी फ्लाइटमधील कोणत्याही अनुचित वर्तनाची त्वरित तक्रार करावी, प्रकरणाचे निराकरण झाले तरीही तक्रार नोंदवा.
-  कॅम्पबेल विल्सन, सीईओ

Web Title: Flight attendants brought 'him' against his will, incident recounted by victim in Air India flight urination case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.