बापरे! बॉयफ्रेंड गप्प बसेना म्हणून गर्लफ्रेंड संतापली अन् प्यायला दिलं विष, मग..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 09:54 AM2021-12-22T09:54:09+5:302021-12-22T09:56:48+5:30

एक महिला आपल्या बॉयफ्रेन्डच्या बोलण्याला इतकी त्रासली होती, की त्याला गप्प करण्यासाठी तिनं विषच दिलं.

in florida woman says she poisoned boyfriend to shut him up police arrested | बापरे! बॉयफ्रेंड गप्प बसेना म्हणून गर्लफ्रेंड संतापली अन् प्यायला दिलं विष, मग..

बापरे! बॉयफ्रेंड गप्प बसेना म्हणून गर्लफ्रेंड संतापली अन् प्यायला दिलं विष, मग..

Next

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एका महिलेनं आपल्याच बॉयफ्रेन्डला विष दिल्याची घटना घडली आहे. आपल्या बॉयफ्रेन्डच्या बोलण्याला ती महिला इतकी त्रासली होती की तिनं त्याला गप्प करण्यासाठी चक्क विषच दिलं.

AP न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या ५४ वर्षीय महिलेचं नाव एल्विस पॅरिश असं आहे. तिनं आपल्या ६१ वर्षीय बॉयफ्रेन्ड विलियम कार्टर याला लेमनेडमध्ये विष मिसळून प्यायला दिलं. इतकंच नाही, तर यानंतर एल्विस हीनं स्वत:च पोलिसांना फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एल्विसनं आपला गुन्हा कबुलही केला आहे. जर आपण असं केलं नसतं तर आपला बॉयफ्रेन्ड गप्पच बसला नसता. तो खुप जास्त बोलायचा आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत होता, असं एल्विसनं पोलिसांना सांगितलं.

रिपोर्टनुसार विष दिल्यानंत विलियमची तब्येत खराब झाली आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. हे पाहिल्यानंतर एल्विस खुप घाबरली आणि तिनं पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि विलियम याला रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारानंतर डॉक्टरांना विलियमला वाचवण्यात यश आलं. परंतु सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी त्याच्याकडे यासंदर्भात विचारणा केली तेव्हा लेमोनेडची चव वेगळी लागत होती असं त्यानं सांगितलं. परंतु आपली गर्लफ्रेन्ड असं काही करू शकेल यावर विश्वास बसत नसल्याचंही त्यानं सांगितलं. या घटनेनंतर एल्विसच्या घराची पोलिसांनी झडती घेत काही पदार्थ तपासणीसाठी पाठवले. यानंत एल्विसला पोलिसांनी अटक केली.

Web Title: in florida woman says she poisoned boyfriend to shut him up police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.