‘फ्लावर नहीं… फायर है मैं’, पोलिस ठाण्यात तरुणाचा डायलॉग ऐकून पोलिसही झाले हैराण; व्हिडिओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 09:53 PM2022-02-11T21:53:09+5:302022-02-11T21:53:47+5:30
Crime News : अमन कुमार सिंग हा युवक नागेश्वर सिंगचा मुलगा असून तो कौआकोल पोलीस स्टेशन हद्दीतील तरौनी गावातील रहिवासी आहे.
नवादा : बिहारमधील नवादा जिल्ह्यात एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा जिल्ह्यातील कौआकोल पोलीस ठाण्यात जाऊन 'पुष्पा' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये मुलाने पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत हा व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर मुलाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, हा मुलगा पोलिसांसमोर ओरडत आहे आणि बोलत आहे, चला मारहाण करा. तरूणाने पोलिसांसमोर ‘फ्लावर नहीं… फायर है मैं’, डायलॉग बोलून दाखवल असल्याचे समजते. त्यानंतर या तरुणाने पोलीस ठाण्यात तासनतास हाय व्होल्टेज ड्रामा केला आणि पोलीस बघतच राहिले. व्हिडिओमध्ये हा तरुण कौआकोल पोलिस स्टेशनच्या पोलिसांवर मारहाणीचा आरोप करताना दिसत आहे.
पुष्पा चित्रपटाचा डायलॉग 'पुष्पा को फूल समझ गई का आग हूँ मैं आग' फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर खूप पाहिले जात आहे. मात्र चित्रपटानंतर फिल्मी स्टाईलमध्ये हा डायलॉग पोलीस ठाण्यात पाहायला मिळत आहे. मात्र हा व्हिडीओ कधी बनवला गेला याची माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिहारमधील एका तरुणाने अलीकडेच पोलिस ठाण्यात आलेल्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील डायलॉग बोलून पोलिसांनाही आश्चर्यचकित केले.
अमन कुमार सिंग हा युवक नागेश्वर सिंगचा मुलगा असून तो कौआकोल पोलीस स्टेशन हद्दीतील तरौनी गावातील रहिवासी आहे. तरुणाचे म्हणणे आहे की, 30 जानेवारी रोजी त्याचे काका त्याच्यावर दारू पिल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. जिथे पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन जखमी झाला. त्याने कधीच गुटखा खाल्ला नाही आणि दारू पिण्याबद्दल बोलत त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. दारू पिऊन कायदा मोडला असेल तर तुरुंगात का पाठवले नाही, असा जाब हा तरुण पोलिसांना विचारत आहे.