बर्थडे पार्टी करण्यासाठी ३ मित्रांनी वेबसिरीज पाहून दरोड्याचा प्लॅन आखला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 11:03 AM2023-06-06T11:03:09+5:302023-06-06T11:03:35+5:30
यापूर्वीही त्यांनी अशीच घटना घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. जे शस्त्र या दरोड्यासाठी वापरण्यात आले होते ते कुठेतरी खाली पडल्याचे सापडले असल्याचा दावा आरोपींनी पोलिसांसमोर केला.
लखनौ - प्रत्येक व्यक्तीला आपला वाढदिवस उत्साहात साजरा करण्याची इच्छा असते. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. ही गरज पूर्ण करण्यासाठी लखनौमध्ये तीन मुलांनी एक धक्कादायक पाऊल उचललं. राज्याच्या राजधानीत तीन मुलांना वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी २५ हजार रुपयांची गरज होती. दरम्यान, त्यांना एक वेब सिरीज पाहून येथून दरोड्याची कल्पना सुचली.
यानंतर तिघेही मादियानव परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचले. प्रत्येकाने रुमालाने तोंड झाकले होते. यानंतर एकाने पिस्तूल काढून दरोड्याचा प्रयत्न केला मात्र यश मिळाले नाही. यानंतर आरोपी फरार झाला, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. यातील दोन आरोपी खडरा येथील तर एक मादियानव भागातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यातील दोघांनी घटनेच्या वेळी मास्क लावला होता, तर एकाने तोंडाला टॉवेल बांधला होता.
दरोडा टाकण्यासाठी माहेश्वरी ज्वेलर्सची निवडलं
उत्तर पोलीस उपायुक्त कासिम अब्दी यांनी सांगितले की, ३० मे रोजी मादियानव पोलिस स्टेशन परिसरात माहेश्वरी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ३ चोरटे दुकानात घुसल्याचे दिसून आले. कारवाई करत पोलिसांनी तिघांनाही अटक केली, आरोपींकडून 'नंबर नसलेली स्कूटी जप्त' करण्यात आली.
त्यांनी पुढे सांगितले की, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली स्कूटी नंबर नसलेली होती. यापूर्वीही त्यांनी अशीच घटना घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. जे शस्त्र या दरोड्यासाठी वापरण्यात आले होते ते कुठेतरी खाली पडल्याचे सापडले असल्याचा दावा आरोपींनी पोलिसांसमोर केला.