वृध्देच्या घरात जबरी चोरी
By कुमार बडदे | Updated: March 3, 2023 16:47 IST2023-03-03T16:47:20+5:302023-03-03T16:47:34+5:30
येथील कौसा परीसरात रहात असलेल्या ६५ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेच्या घरातील तब्बल ४ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा ऐवजाची जबरी चोरी

वृध्देच्या घरात जबरी चोरी
मुंब्राः
येथील कौसा परीसरात रहात असलेल्या ६५ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेच्या घरातील तब्बल ४ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा ऐवजाची जबरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.सदर वृद्धा १७ जानेवारीला काही कामानिमित्त तीच्या मूळगावी गेली होती.तेथून परत आल्यानंतर काही दिवसांनी तीने घरातील कपाट उघडून बघितले असता कपाटा मधील सोन्या,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून तब्बल ४ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे तीच्या लक्षात आले.याबाबत गुरुवारी रात्री तीने दाखल केलेल्या तक्रारी वरुन विविध कलमा अंतर्गत अनोळखी चोरा विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,या प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष उगलमुगले करत आहेत.