"बळजबरीनं सेक्स, ओपन मॅरेजसाठी दबाव टाकायचा..."; पत्नीचे प्रसन्ना शंकर यांच्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:38 IST2025-04-08T10:37:08+5:302025-04-08T10:38:11+5:30
प्रसन्ना शंकर याला कुटुंबाची पर्वा नव्हती. शंकर एक पती आणि मुलाचे वडील म्हणून निष्काळजी होता असा आरोप पत्नी शशिधरने केला आहे.

"बळजबरीनं सेक्स, ओपन मॅरेजसाठी दबाव टाकायचा..."; पत्नीचे प्रसन्ना शंकर यांच्यावर आरोप
ग्लोबल टेक इंडस्ट्रीतील दिग्गज Rippling चे सह-संस्थापक प्रसन्ना शंकर यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप लावले आहेत. लग्नानंतरही शारीरिक संबंध, वेश्यासोबत संबंध आणि ओपन मॅरेजसाठी दबाव टाकणे यासारखे आरोप पत्नीने लावले आहेत. प्रसन्ना शंकर आणि त्यांची पत्नी शशिधर यांच्यात घटस्फोटाची लढाई सुरू आहे. त्यात पत्नी शशिधर यांनी घटस्फोटाच्या अर्जात प्रसन्ना शंकर यांच्यावर हे धक्कादायक आरोप केले आहेत.
रिप्पलिंगचे सह-संस्थापक प्रसन्ना शंकर यांची संपत्ती १.३ बिलियन डॉलर आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी पोलीस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे, जे बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होते. माझ्या पत्नीचे दिव्या शशिधरचे विवाहबाह्य संबंध होते असा आरोप त्यांनी केला होता. आता पत्नी शशिधर यांनी प्रसन्ना शंकर यांच्याविरोधात वेगवेगळे दावे केलेत. सॅन फ्रॅन्सिको स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, पतीकडून ओपन मॅरेजसाठी दबाव टाकला जात होता. माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरात छुपे कॅमेरे लावले होते. मी पतीसाठी माझं करिअर सोडलं. २०१६ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर लगेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मला मजबूर केले. मी नकार दिला तेव्हा सेक्स माझ्यासाठी मुलभूत गरज आहे, तुला हे करावेच लागेल, तुला किती वेदना होतील याची मला पर्वा नाही असं पतीने म्हटल्याचा दावा पत्नीने केला.
त्याशिवाय जर तु हे करु दिलं नाही तर मी बाहेर जाऊन हे काम करेन असं पतीने म्हटलं. पत्नी शशिधरने डिसेंबर २०१९ ला पाठवलेल्या ईमेलचा हवाला दिला. ज्यात प्रसन्ना शंकर यांनी अनेक वेश्यांसोबत संपर्क करत त्यांचे फोटो आणि दर मागितले होते. आमच्या दोघांची भेट २००७ साली झाली. २ वर्ष डेटिंग केली. शंकर सिलिकॉल व्हॅली इथं एका सोशल मिडिया कंपनीत काम करत होता. त्यावेळी शंकर आणि शशिधर यांच्यात काही काळ अंतर आले. त्या काळात शशिधरने कॅम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. २०१३ साली ते दोघे पुन्हा भेटले. शशिधरच्या घरातून विरोध असतानाही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
"मोठ्या साईजचं Condom घेऊन ये..."; बड्या टेक कंपनीच्या फाऊंडरनं पत्नीचं चॅट उघड केलं
दरम्यान, प्रसन्ना शंकर याला कुटुंबाची पर्वा नव्हती. शंकर एक पती आणि मुलाचे वडील म्हणून निष्काळजी होता. जेव्हा शंकर घरी येत होता तो लॅपटॉपवर काम करायचा, त्याच्याकडे खूप कमी वेळ असायचा. मात्र वेळ कमी असूनही तो कायम सेक्सची मागणी करत होता असंही पत्नीने आरोप केला आहे.
प्रसन्ना शंकर यांनी काय केले होते आरोप?
दिव्याचं अनूप नावाच्या युवकासोबत गेल्या ६ महिन्यापासून अफेअर सुरू असल्याचं प्रसन्नाने सांगितले होते. त्यांनी काही पोस्टमध्ये स्क्रिनशॉट्स शेअर केलेत. त्यात पत्नीकडून अनुपला पाठवलेले मेसेज आहेत. पहिल्या स्क्रिनशॉट्समध्ये दिव्याचे मेसेज पाहता येतात. त्यात तू एक्स एल साइजमध्ये कंडोम घेऊन ये, ते गार्जियन, वॉटसन्स अथवा ७-११ वर आहे. या मेसेजला रिप्लाय देऊ नकोस, मी आता डिलिट करत आहे. हे सर्व ऑर्चर्ड रोडवर आहे. हे सर्व मेसेज अनूपच्या पत्नीने प्रसन्ना यांना पाठवल्याचं त्याने म्हटलं आहे. दुसऱ्या स्क्रिनशॉट्समध्ये २ एडल्ट्ससाठी हॉटेल रूम बुकींग आहे. ज्यात दिव्याच्या ईमेल आयडीवरून बुक केले आहे असा आरोप प्रसन्ना शंकर यांनी केला होता.