हातावर फटका मारून पादचाऱ्याच्या मोबाईलची जबरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 18:47 IST2021-09-15T18:47:09+5:302021-09-15T18:47:54+5:30
Crime News : श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

हातावर फटका मारून पादचाऱ्याच्या मोबाईलची जबरी चोरी
ठाणे: वागळे इस्टेट, किसननगर क्रमांक येथील बस थांब्याजवळून पायी जाणाऱ्या प्रकाश घागरे (५१) या पडचाऱ्याच्या हातावर फटका मारून तिघांनी त्यांचा मोबाईल जबरीने चोरल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
घागरे हे १४ सप्टेंबर रोजी पहाटे ५.५० वाजण्याच्या सुमारास किसननगर येथील टीएमटी बस थांब्या समोरील रस्त्याने जात होते. त्याच वेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील आठ हजारांचा मोबाईल हिसकावून पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घागरे यांनीही आरडाओरडा करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या टोळक्याने तिथून पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक तेजाशू पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.