लक्ष्मण झुल्यावर विदेशी युवतीने शूट केला न्यूड व्हिडीओ, अटकेनंतर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 08:19 PM2020-08-29T20:19:47+5:302020-08-29T20:34:36+5:30
२७ वर्षीय विदेशी युवती ऋषिकेश येथील लक्ष्मण लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट करत होती.
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील गंगा नदीवरील लोकप्रिय लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका फ्रेंच युवतीला अटक केली. मात्र, या विदेशी युवतीला काही अटींवर जामीन मिळाला आहे.
रिपोर्टनुसार, एक २७ वर्षीय विदेशी युवती ऋषिकेश येथील लक्ष्मण लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट करत होती. याप्रकरणी येथील स्थानिक नगरसेवक गजेंद्र सजवान यांनी २५ ऑगस्ट रोजी या युवतीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऋषिकेशमधील मुनी की रेती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ उपनिरीक्षक आर. के. सैनी म्हणाले की, "सजवान यांनी तक्रार केली होती की, एक महिला न्यूड व्हिडिओ व फोटो शूट करत होती." सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळाल्याचे नगरसेवक म्हणाले होते.
तक्रारीनंतर विदेशी युवतीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हा आरोप खरा असल्याचे आढळून आले आणि लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट झाल्याचेही स्पष्ट झाले. सार्वजनिक ठिकाणी असे करणे अश्लील मानले जाते. काही स्थानिक लोकांनी सांगितले की, ती युवती ऋषिकेशमधील हॉटेलमध्ये थांबली होती. त्यानंतर या युवतीचा शोध घेऊन पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन तिची या घटनेविषयी चौकशी केली.
चौकशी दरम्यान या आरोपी युवतीने न्यूड व्हिडिओ शूट करण्याचे कबूल केले. मात्र, भारतात हे बेकायदेशीर आहे, याची माहिती नसल्याचे या युवतीने म्हटले आहे. नेकलेसच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने तिने हा व्हिडिओ आणि फोटोशूट केल्याचे या महिलेने सांगितले. यानंतर तिला अटक केली. मात्र, जामिनावर तिची सुटका करण्यात आली.
आणखी बातम्या...
काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...
धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार
- CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...
- आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार