दिल्लीत परदेशी महिला आणि तिच्या १३ महिन्यांचा मुलाची हत्या, मैत्रिणीच्या घरी आढळून आले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 05:51 PM2021-09-22T17:51:40+5:302021-09-22T18:00:47+5:30
महिला पतीसोबत ग्रेटर कैलाश पार्ट २ मधील एका घरात राहत होती. मात्र, महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह कालकाजी भागातील एक दुसऱ्याच घरात आढळून आले.
देशाची राजधानी दिल्लीच्या कालकाजी भागात गर्भवती परदेशी महिला आणि तिच्या १२ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. महिला किर्गिस्तानची मूळ रहिवाशी होती. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव मिस्कल जुमाबेवा (२८) आणि तिच्या मुलाचं नाव मानस (१३ महिने) आहे. घटनेपासूनच महिलेचा पती फरार आहे. महिलेने भारतीय नागरिकासोबत लग्न केलं होतं. महिला पतीसोबत ग्रेटर कैलाश पार्ट २ मधील एका घरात राहत होती. मात्र, महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह कालकाजी भागातील एक दुसऱ्याच घरात आढळून आले.
पोलीस अधिकारी म्हणाले की, महिला आणि तिच्या मुलाची हत्या चाकूने करण्यात आली आहे. महिलेच्यी शरीरावर चाकूचे चार आणि मुलाच्या मानेवर चाकूने पाच वार केले आहेत. पोलिसांचा अंदाज आहे की, हल्लेखोर दोघांनाही मेलेलं समजून घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. (हे पण वाचा : प्रेयसी आणि तिच्या पतीचा खेळ केला खल्लास, चिमुकली म्हणाली - मामानेच आई-बाबांना मारलं....)
हत्याकांडाआधी झालं होतं भांडण
घटनेनंतर गायब झालेल्या महिलेच्या पतीचं नाव विनय चौहान आहे.. दोघांचं लग्न दोन वर्षाआधी झालं होतं. महिला गर्भवती होती. गेल्या रात्री महिलेला डॉक्टरकडे जायचं होतं. यावरूनच तिचं पतीसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर रागावलेला पती विनय चौहान पत्नीला सोडून कुठेतरी निघून गेला. त्यानंतर मिस्कल जुमाबेवाने आपल्या परिचयाच्या एका महिलेकडे मदत मागितली. मतलूबा नावाची ही महिला मूळची उझबेकिस्तानची आहे. ती सध्या कालकाजीमध्ये भाड्याने राहते. याच घरात दोघांचे मृतदेह आढळून आले. डीसीपीनुसार, घरातून पत्नीसोबत भांडण झाल्यावर पती त्याचा मित्र वाहिद याच्याकडे गेला होता. (हे पण वाचा : बाउंसरने पैशांसाठी अब्जाधीशाच्या मुलीला बनवलं गर्लफ्रेन्ड, नंतर केली तिची हत्या; कारण...)
अनेक प्रश्न उपस्थित
तेच महिलेने बोलवल्यावर घरी आलेली महिला मैत्रीण मतलुबा मदुसमोनोवा आणि तिचा मित्र अवनीश रात्रीच तिच्या ग्रेटर कैलाश येथील घरी पोहोचले. प्रसव समस्येमुळे दोघांनी महिलेला पतीच्या अनुपस्थितीत डॉक्टरकडे नेलं होतं. मंगळवारी दुपारी पोलिसांना सूचना मिळाली की, आई आणि मुलाचा मृतदेह त्याच उझबेकिस्तानी महिला मित्राच्या घरी आहेत. याच महिलेला मिस्कलने रात्री मदतीसाठी बोलवलं होतं. पोलिसांना हे समजू शकलेलं नाही की, ज्या महिलेला मिस्कलने मदतीसाठी बोलवलं होतं त्याच महिलेच्या घरात तिचा आणि मुलाचा मृतदेह कसा आढळून आला? आई आणि मुलाची हत्या महिला मैत्रीणीच्या घरातच कशी झाली?