परदेशी ठगांनी बदलापूरच्या तरुणाला ऑनलाईन घातला लाखोंचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 09:16 PM2018-08-29T21:16:56+5:302018-08-29T21:17:28+5:30

व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि जीमेलवरून मयुरेश चौधरीला नफ्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपये भरण्यास सांगितले होते. मात्र, त्या रक्कमेचा परतावा न देता मयुरेशची फसवणूक केली.

foreigner frauders looted lakhs of rupees of badlapur youth | परदेशी ठगांनी बदलापूरच्या तरुणाला ऑनलाईन घातला लाखोंचा गंडा 

परदेशी ठगांनी बदलापूरच्या तरुणाला ऑनलाईन घातला लाखोंचा गंडा 

Next

बदलापूर - ऑनलाईन व्यवहारातून भरघोस नफ्याचे आमिष दाखवून दोघा परदेशी ठगांनी बदलापूरला राहणाऱ्या तरुणाला 20 लाखांचा गंडा घातला आहे. व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि जीमेलवरून मयुरेश चौधरीला नफ्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपये भरण्यास सांगितले होते. मात्र, त्या रक्कमेचा परतावा न देता मयुरेशची फसवणूक केली.

मयुरेश चौधरीला परदेशी बायनरी ऑप्शन प्लॅटफॉर्म या ट्रेडिंग कंपनीतून लाना डाब्रीज आणि डोनाल्ड स्मिथ यांनी गुंतवणूक करण्यास सांगून त्याला 10 टक्के नफ्याचे आमिष दाखवले. यावेळी पैशांची गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या दोन बँकांच्या खात्यात तब्बल 20 लाख 35 हजार 427 रुपये ऑनलाईन आणि आरटीजीएस पद्धतीने भरण्यास सांगितले. मात्र, भरलेली रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे मयुरेशच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार केली.

Web Title: foreigner frauders looted lakhs of rupees of badlapur youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.