15 हजारांची लाच स्वीकारताना वनपाल ताब्यात; सिंधुदुर्ग लाचलुचपतची कारवाई

By अनंत खं.जाधव | Published: March 2, 2024 02:44 AM2024-03-02T02:44:39+5:302024-03-02T02:45:17+5:30

या प्रकरणी राठोड याच्यावर भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Forester arrested while accepting bribe of 15 thousand Sindhudurg bribery action | 15 हजारांची लाच स्वीकारताना वनपाल ताब्यात; सिंधुदुर्ग लाचलुचपतची कारवाई

15 हजारांची लाच स्वीकारताना वनपाल ताब्यात; सिंधुदुर्ग लाचलुचपतची कारवाई

सिंधुदुर्ग: लाकूड वाहतुकीचा परवाना देण्यासाठी तब्बल १५ हजारांची लाच स्वीकारताना कुडाळ तालुक्यातील नेरूर तर्फ हवेली येथील वनपाल अनिल राठोड याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  ही कारवाई सिंधुदुर्ग लाच लुचपत विभागाकडून शुक्रवारी रात्रीउशिरा करण्यात आली. या प्रकरणी राठोड याच्यावर भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड यांच्याकडून सतत होत असलेल्या पैशाच्या तगाद्याने कंटाळलेल्या कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील तक्रारदाराने थेट लाचलुचपत कडे तक्रार करत वनपाल याला पकडून दिले. यात वनविभागाच्या परवानगीने तक्रारदार लाकूड माल तयार केला होता. या मालाची वाहतूक करण्यासाठी परवानगी आवश्यक असलेला परवाना त्यांनी मिळवण्यासाठी राठोड यांच्याकडे अर्ज केला होता. परंतु हा परवाना देण्यासाठी राठोड यांनी तब्बल २० हजार रुपयांची  मागणी केली होती, त्यातील पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंधुदुर्ग लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Forester arrested while accepting bribe of 15 thousand Sindhudurg bribery action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.