भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 04:24 PM2022-01-30T16:24:58+5:302022-01-30T18:49:26+5:30

Former BJP corporator in mocca custody :खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत.

Former BJP corporator is mocca custody till February 4 | भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

Next

कल्याण - भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून कल्याणच्या विशेष मोकका न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत.


खेमा याने कल्याणमधील भूषण जाधव याला शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांच्याबरोबर  फिरतो म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना 3 जानेवारीला रात्री 11.30 ला घडली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खेमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणातील साक्षीदार असलेले व्यापारी अमजद सय्यद याला धंदा चालू ठेवायचा असेलतर पाच लाख रूपये दे अशी खंडणीची धमकी देत त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना 5 जानेवारीच्या पहाटे घडली होती. यात खेमासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्हयांप्रकरणी खेमासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि वाढती गुन्हेगारी पाहता त्याच्यावर मोकका अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती. यासंदर्भातला अहवाल पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली.

सतर्क प्रवाशामुळे लुटारू गजाआड, एक्सप्रेसमध्ये बॅग हिसकवणाऱ्या पाच जणांना अटक


भाजपला धक्का
दरम्यान खेमा च्या सुटकेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. खेमा सह अन्य दोन नगरसेवकांना सत्ताधारी शिवसेनेने जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप करीत भाजपने राज्य सरकारविरोधात शनिवारी अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कारण पुढे करीत मोर्चा रद्द करण्यात आला. खेमा विरोधात मोक्का अंतर्गत झालेली कारवाई आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘दे धकका’ असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक आणि पदाधिका-यांचे धाबे दणाणल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे.

Web Title: Former BJP corporator is mocca custody till February 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.