अंबरनाथमध्ये भाजपा माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

By पंकज पाटील | Updated: April 6, 2025 13:21 IST2025-04-06T12:28:17+5:302025-04-06T13:21:22+5:30

ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही केला तलवारीने हल्ला

Former BJP corporator office attacked with a sword in Ambernath Case registered against attackers | अंबरनाथमध्ये भाजपा माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये भाजपा माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथ: मधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हातात तलवारी घेऊन हल्ला केला. यामध्ये ऑफिसचे मोठे नुकसान झाले असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचे अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले १० ते १२ हल्लेखोर आले. त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला. तसेच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तलवारीने वार करत नासधूस केली.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. अवघ्या २३ सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Web Title: Former BJP corporator office attacked with a sword in Ambernath Case registered against attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.