भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 09:15 PM2020-09-02T21:15:12+5:302020-09-02T21:15:59+5:30

मेहता व साथीदारांनी सदर जमिनीचा कब्जा घेण्यासाठी अचानक जमून रखवालदारास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. 

Former BJP MLA Narendra Mehta and other accomplices have been booked | भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देया प्रकरणी जमीन मालक असलेले श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर  भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी नगरसेवक प्रशांत केळुसकर, मेहतांचे निकटवर्तीय संजय थरथरे आणि इतर ३५- ४० जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या तोदिवाडी जमिनीचा बळजबरी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी भाजपा नगरसेवक प्रशांत केळुस्कर , मेहता समर्थक संजय थरथरे आणि इतर ३५ ते ४० जणांवर मंगळवारी रात्री भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

भाईंदरच्या तोदिवाडी येथील २७ हजार १९० हजार चौ.मी. चा भूखंड असून सदर भूखंडावरून मंगळवारी सायंकाळी वाद झाला. सदर वादाची माहिती कळताच भाईंदरमध्ये विसर्जन व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेले पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड , अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील सह स्थानिक पोलीस अधिकारी व मोठा पोलिसफाटा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी तेथून जमाव पांगवला. घटनास्थळी स्वतः मेहता, केळुस्कर आदी उपस्थित होते .

या प्रकरणी जमीन मालक असलेले श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर  भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी नगरसेवक प्रशांत केळुसकर, मेहतांचे निकटवर्तीय संजय थरथरे आणि इतर ३५- ४० जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.अग्रवाल यांच्या फिर्यादी नुसार, सदर जमिनीची मालकी आणि ताबा त्यांचे असून तसे फलक लावले होते. परंतु मेहता व साथीदारांनी सदर जमिनीचा कब्जा घेण्यासाठी अचानक जमून रखवालदारास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आपले आधीचे फलक तोडले व ते चोरून नेले. रखवालदाराची कॅबिन तोडली. जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला.

तर आज बुधवारी माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर म्हणाले कि , सदर जागा आम्ही खरेदी केली असून आमचे वोचमन तेथे आहेत . सदर जागेत बाहेरची काही माणसे घुसल्याचे कळल्याने आम्ही देखील तिकडे गेलो होतो. आमची फिर्याद आज पोलिसांना दिली असून गुन्हा दाखल केला जात आहे . स्वतः पोलीस अधीक्षक घटनास्थळी येतो याचा अर्थ राजकीय दबावाखाली आमच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप केळुस्कर यांनी केला.  

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

Web Title: Former BJP MLA Narendra Mehta and other accomplices have been booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.