शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:31 AM2021-09-15T11:31:55+5:302021-09-15T11:37:34+5:30

या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते

Former Deputy Mayor Shripad Chhindam arrested, police action of ahmednagar in atrocity case | शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अटक

शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देएका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी छिंदमसह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर : दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली. या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. तर,याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 

एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी छिंदमसह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात, छिंदमसह त्याच्या भावाला अटक करण्यात आली.  याप्रकरणी आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची घटना 9 जुलै 2021 दिवशी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

शिवरायांबद्दल छिंदमचे अपशब्द 

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला  उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता. छिंदमने विधानसभा निवडणुकीत बसपच्या तिकीटावर रिंगणात उतरला होता. परंतु, मतदारांनी नाकारल्यामुळे तो विधानसभेत पोहोचला नाही. 

Web Title: Former Deputy Mayor Shripad Chhindam arrested, police action of ahmednagar in atrocity case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.