माजी उपमहापौराच्या मुलाला अखेर अटक, ‘वंचित बहुजन’च्या पदाधिकाऱ्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:06 AM2023-06-24T06:06:53+5:302023-06-24T06:07:01+5:30
चेंबूरच्या लालडोंगर येथे दोन महिन्यांपूर्वी गायकवाड यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यावरून वाद निर्माण झाला.
मुंबई : वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर अशोक रणशूर यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याच्या आरोपावरून पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा मुलगा सिद्धांत याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. त्या हल्ल्यात रणशूर यांच्यासह वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिस तपापात उघड झाले आहे.
चेंबूरच्या लालडोंगर येथे दोन महिन्यांपूर्वी गायकवाड यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी परमेश्वर रणशूर यांनी गायकवाडना पकडून चुनाभट्टी पोलिस ठाण्यात नेले. यामुळे त्या घटनेच्या रागातून गायकवाड याने कट
रचल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे वर्तवला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्या चौघांना अटक केली होती, त्यांच्या चौकशीत गायकवाड आणि त्यांचा मुलगा याचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने सिद्धांत गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.