माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने सुनावली ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:24 IST2021-11-02T16:23:58+5:302021-11-02T16:24:44+5:30
Anil Deshmukh Arrested by ED : आज त्यांना सत्र न्यायालयात विशेष PMLA कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत आदींची कोठडी सुनावली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने सुनावली ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी
मुंबई - १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Arrest) यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) अखेर अटक करण्यात आली आहे. आज त्यांना सत्र न्यायालयात विशेष PMLA कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत आदींची कोठडी सुनावली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
मुंबई - अनिल देशमुख यांना न्यायालयाने सुनावली ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी pic.twitter.com/5OZqxiTqWQ
— Lokmat (@lokmat) November 2, 2021
अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे.