कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 20:43 IST2025-04-20T20:40:56+5:302025-04-20T20:43:02+5:30
कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांचा मृतदेह राहत्या घरात आढलला.

कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
Karnataka News : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ते रविवारी बंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, त्यांच्या पत्नीवरच हत्येचा संशय आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
बंगळुरुमधील के एचएसआर लेआउट येथील राहत्या घरात ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेमागे ओम प्रकाश यांच्या पत्नीचा हात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू केला आहे. एवढ्या मोठ्या पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
IPS ओम प्रकाश यांचा परिचय
1981 च्या बॅचचे IPS अधिकारी ओम प्रकाश 2015 मध्ये राज्याचे 38वे महासंचालक बनले होते. ओम प्रकाश यांनी होमगार्ड कमांडंट जनरल आणि सिव्हिल डिफेन्स संचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे महासंचालक या पदांवरही काम केले. त्यांनी कर्नाटकातील बेल्लारी येथील हरपनहल्ली उपविभागाचे एएसपी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मूळ बिहारमधील चंपारण येथील रहिवासी असलेले ओम प्रकाश निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासह बंगळुरुमध्येच राहायचे.