Narendra Mehta: भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह नॉट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 09:04 PM2022-05-21T21:04:37+5:302022-05-21T21:05:22+5:30

Former BJP MLA Narendra Mehta: पदाचा दुरुपयोग करून ८ कोटी २५ लाखांची अपसंपदा गोळा केल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करताच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता पसार झाले आहेत . गुन्ह्यात पत्नी देखील आरोपी असल्याने मेहता पत्नीसह नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येते.

Former MLA Narendra Mehta and his wife are not recoverable after a corruption case was filed against them | Narendra Mehta: भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह नॉट रिचेबल

Narendra Mehta: भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह नॉट रिचेबल

googlenewsNext

मीरारोड - पदाचा दुरुपयोग करून ८ कोटी २५ लाखांची अपसंपदा गोळा केल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करताच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता पसार झाले आहेत . गुन्ह्यात पत्नी देखील आरोपी असल्याने मेहता पत्नीसह नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येते.

२००२ साली अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले नरेंद्र मेहता हे २०१७ पर्यंत नगरसेवक पदी होते . या दरम्यान महापौर , विरोधी पक्ष नेता , प्रभाग समिती सभापती पदांवर ते राहिले . २०१४ ते २०१९ दरम्यान ते भाजपाचे आमदार होते .  २००२ साली नगरसेवक निवडणून येताच काही महिन्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना मेहतांना रंगेहाथ अटक केली होती . सदर प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे . तर २०१५ - १६ दरम्यान तत्कालीन लोकायुक्त एम . एल . ताहिलयानी यांनी मेहतांची भ्रष्टाचार व अपसंपदा बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी लावली होती . सदर ठाणे व पालघर युनिट तेव्हा पासून चौकशीच करत होते . त्या दरम्यान अनेक अधिकारी बदलले . या प्रकरणी राजू गोयल , कृष्णा गुप्ता यांनी सतत तक्रारी चालवल्या होत्या.

अखेर ६ वर्षांनी एसीबीचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली १९ मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार नरेंद्र मेहता व पत्नी सुमन मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच मेहता हे पसार झाले असून त्यांच्या सह त्यांची पत्नी सुद्धा असल्याचे समजते.

गुन्हा दाखल झाल्या नंतर एसीबीच्या पथकाने त्यांचा शगुन बंगला व सेव्हन स्क्वेअर शाळेतील मेहता व त्यांच्या कंपन्यांच्या कार्यालयावर छापेमारी केली . मेहतांच्या कार्यालयात सकाळ  पर्यंत पथक होते . पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आदी जप्त करून ठाणे एसीबी कार्यालयात नेली आहेत . नरेंद्र व सुमन मेहता यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोघेही पसार झाल्याची चर्चा शहर व समाज माध्यमांवर देखील होत आहे . त्यात मीरा भाईंदरचे बंटी - बबली पसार अशी टिप्पणी केली जात आहे.

अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कागदपत्रे आदी जप्त केल्याचा दुजोरा देत अधिक तपशील सांगण्यास नकार दिला . 

Web Title: Former MLA Narendra Mehta and his wife are not recoverable after a corruption case was filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.