खळबळ! मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक
By पूनम अपराज | Published: September 28, 2020 04:28 PM2020-09-28T16:28:14+5:302020-09-28T16:29:12+5:30
शहबाज शरीफ यांच्यावर नुकतीच ४२ मिलियन डॉलर्सच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाकिस्तानच्या राजकारणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सोमवारी म्हणजेच आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ यांना अटक करण्यात आली आहे. शहबाज शरीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप लावण्यात आला आहे.
शहबाज शरीफ यांच्यावर नुकतीच ४२ मिलियन डॉलर्सच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी लाहोर कोर्टात जामीन याचिका दाखल केली होती, परंतु सोमवारी कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. यानंतर त्याला अटक करण्यात आली. शहबाज शरीफ सध्या पाकिस्तानच्या विरोधी पक्षाचे नेते आहेत, नवाज शरीफ यांच्या अनुपस्थितीत पीएमएल (एन) चे प्रमुख आहेत आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री देखील ते होते.
या प्रकरणात शहबाज शरीफ यांच्याशिवाय त्याच्या दोन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहबाज शरीफ यांच्या कुटुंबावर 177 संशयास्पद व्यवहार केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे 25 हजार पानांचे पुरावे एनएबीकडे (NAB) आहेत. या संपूर्ण प्रकरणात शहबाज शरीफ यांच्या कुटूंबाच्या 6 सदस्यांसह एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नवाज शरीफ यापूर्वीच दोषी आढळले आहेत. ते बर्याच दिवसांपासून पाकिस्तानबाहेर असून लंडनमध्ये राहत होते. नवाज शरीफ यांना कोर्टात हजर व्हावे लागते, मात्र ते पाकिस्तानात परत येत नाहीत. अलीकडेच ते विरोधी पक्षाच्या संयुक्त बैठकीत सहभागी झाले होते आणि त्यांना या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष इम्रान सरकारविरोधात निषेध करत होते.
पाकिस्तानः माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक pic.twitter.com/AmYaVw7UbP
— Lokmat (@MiLOKMAT) September 28, 2020
Make no mistake. Shehbaz Sharif has been arrested ONLY because he REFUSED to play in the hands of those who wanted to use him against his brother. He preferred standing behind prison bars than to stand against his brother. Shahbaz Sharif, aap ko SALAM!
— Maryam Nawaz Sharif (@MaryamNSharif) September 28, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक
बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ
महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन
कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक