प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचा रागातून हत्या, सावंतवाडीतील माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाला गोव्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:49 PM2022-06-24T22:49:07+5:302022-06-24T22:49:38+5:30
Murder Case : प्राध्यापिकेचा गळा दाबून केला खून
सावंतवाडी : ओल्ड गोवा येथील प्राध्यापिका गौरी आचार्य हिचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा गौरव प्रकाश बिद्रे याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री तिचा खून करण्यात आला असून शुक्रवारी त्याला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरव याने खुनाची कबुली दिली आहे.तो संबंधित महिलेचा जीम ट्रेनर म्हणून काम करीत होता.
गौरव हा ओल्ड गोवा येथे एका जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान ओल्ड गोवा येथील खाडोळा काॅलेज ची प्राध्यापिका असलेल्या गौरी हिच्याशी त्याची ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. मात्र नंतर गौरीने त्यांच्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतला यामुळे गौरव चांगलाच नैराश्येत होता.
गुरूवारी दुपारी गौरी बेपत्ता झाली म्हणून तिच्या आईने पोलीसात तक्रार दिली पोलीसांकडून गौरीचे मोबाईल लोकेशन तसेच शेवट कोणाला भेटली तिचे मित्र कोण या सर्वाची माहिती घेतली त्यानंतर शुक्रवारी तेथील च जिम ट्रेनर गौरव बिद्रे यांचे नाव पुढे आले असून पोलीसांकडून चौकशी केली असता गौरव याने खुनाची कबुली दिली असून आपणच गौरी हिचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले आहे.
यावरून पोलीसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला तेथील न्यायालयात हजर करण्यात आले असून अधिक तपास गोवा पोलीस करीत आहेत.दरम्यान गौरव हा यापूर्वी मुंबईत मॉडेल म्हणून काम केले होता त्या ठिकाणी अनेक कलाकारांना व उच्चभ्रू लोकांना त्याने जिम ट्रेनिंग दिले होते. त्या काळात मुंबई येथे एका महिलेने त्याच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातून तो जामिनावर बाहेर असल्याचे तेथील पोलीसांनी सांगितले.
मूळचा सावंतवाडीचा असलेला गौरव हा काहि काळ मुंबईत कामानिमित्त होता.त्यानंतर तो गोव्यात वास्तव्य करत होता.चांगल्या कुटुंबातील मुलगा अशी त्यांची ओळख होती.मात्र काल घडलेल्या घटनेनंतर सावंतवाडीत खळबळ माजली आहे.