बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुखास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:42 PM2021-05-31T17:42:02+5:302021-05-31T17:43:25+5:30
Extortion Case : आर्वी पोलीस स्टेशनमध्ये निलेश देशमुख यांच्या वर कलम ३४१ ,व ३८४ कायम करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती या प्रकरणाचे चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
आर्वी( वर्धा) : देऊरवाडा ते आर्वी या हायवेचे काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारा सुरू आहे. या कामावरील सुपरवायझरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांना सोमवारी साडेतीन वाजता अटक करण्यात आली.
कंपनीच्या रस्ता बांधकामांवर काम करीत असलेले सुपरवायझर अनिकेत नंदकिशोर वसु (वलगाव) यांना जीवे मारण्याची धमकी व खंडणी मागितल्या बाबतची तक्रार आर्वी पोलीस स्टेशन येथे अनिकेत वसु यांनी दिली होती. असून या प्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांना अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रानुसार इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सुपरवायझर अनिकेत वसु हे देऊरवाडा- आर्वी रस्त्याचे काम सुरू असताना तेथे नीलेश देशमुख हे येऊन काम सुरू असलेल्या टिप्पर समोर इनोवा गाडी देशमुख यानीं आडवी लावून काम बंद केले व मला वर्गणीचे पैसे जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत काम करू देणार नाही अशी धमकी दिली. माझे मालकाला व मला अश्लील शिवीगाळ करून मला जिवे मारण्याची धमकी दिली.
३० मेला सुद्धा निलेश देशमुख व चार ते पाच लोक घेऊन देऊरवाडा आर्वी रस्त्याचे काम बंद करण्यासाठी आले व जोपर्यंत माझी वर्गणी देत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही अशा प्रकारची बतावणी करून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन मला कामबंद पाडण्यास भाग पाडले असाही उल्लेख सुपरवायझर अनिकेत नंदकिशोर वसू यांनी आर्वी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केला आहे. आर्वी पोलीस स्टेशनमध्ये निलेश देशमुख यांच्या वर कलम ३४१ ,व ३८४ कायम करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती या प्रकरणाचे चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.